ETV Bharat / bharat

नवनियुक्त राज्यसभा खासदारांचा 'या' तारखेला होणार शपथविधी - newly elected members rajya sabha

राज्य सभा सत्राच्या मध्यावधीत पहिल्यांदाच खासदारांना शपथ दिली जाणार आहे. सामान्यपणे शपथविधी कार्यक्रम राज्यसभा सत्र सुरु असताना किंवा राज्य सभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये पार पडत असतो. मात्र, कोरोनामुळे यात बदल करण्यात आले आहेत.

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Jul 17, 2020, 5:37 PM IST

नवी दिल्ली - राज्य सभेच्या नवनियुक्त खासदारांचा शपथविधी 22 जुलैला होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. कोरोनामुळे सामाजिक अंतर आणि इतर सुरक्षेच्या नियमांचे पालन करत शपथविधी कार्यक्रम होणार आहे. 20 राज्यातील 61 नवनियुक्त सदस्य शपथ घेणार आहेत.

राज्यसभा सत्राच्या मध्यावधीत पहिल्यांदाच खासदारांना शपथ दिली जाणार आहे. सामान्यपणे शपथविधी कार्यक्रम राज्यसभा सत्र सुरु असताना किंवा राज्य सभा अध्यक्षांच्या चेंबरमध्ये पार पडत असतो. मात्र, कोरोनामुळे यात बदल करण्यात आली आहेत. एका खासदाराला फक्त एकच अतिथी आणण्यास परवानगी देण्यात आली आहे.

संसदीय समित्यांचे कामकाज सुरळीतपणे सुरु होण्यासाठी नवनियुक्त खासदाराना शपथ देण्याचा निर्णय राज्यसभा अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी घेतला. निवडून आलेल्या सदस्यांनी समित्यांच्या बैठकात भाग घेण्यासाठी उत्साह दाखवला होता. मात्र, शपथविधी झाल्याशिवाय कामकाजात सहभागी होता येत नव्हते. राज्यसभेच्या महासचिवांनी सर्व सदस्यांना शपथविधी कार्यक्रमाची कल्पना दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.