मुरादाबाद - उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे उसाच्या शेतात एक नवजात अर्भक सापडले. गेल्या दोन महिन्यांतील जिल्ह्यातील ही चौथी घटना आहे.
ही बाब चारा गोळा करण्यासाठी शेतात गेलेल्या कुंदरकी गावातील काही स्थानिकांच्या लक्षात आली. या बाळाची नाळही अद्याप अखंड असल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - वेदनादायी.. बंगळुरूत पावसाच्या हाहाकारानंतर 'या' महिलेवर मुलांसह सार्वजनिक शौचालयात राहण्याची वेळ
यानंतर ताबडतोब अॅन्टी ट्रॅफिकिंग स्कॉडला (मानवी तस्करीविरोधी पथक) कळविण्यात आले आणि बाळाला जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू युनिटमध्ये नेण्यात आले.
बाल कल्याण समितीच्या (सीडब्ल्यूसी) अधिकाऱ्यांनी सांगितले की, बाळाची प्रकृती स्थिर असून लवकरच त्याला रामपूर येथील अनाथाश्रमात पाठविले जाईल.
'जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत चार अर्भकांना अशाच प्रकारे सोडून देण्यात आले आहे, ही चिंताजनक बाब आहे. मात्र, या बाळाची तब्येत चांगली असून बालरोग तज्ज्ञ त्याची चांगली देखभाल करत आहेत,' असे मोरादाबाद येथील सीडब्ल्यूसी सदस्या नीतू सक्सेना म्हणाल्या.
हेही वाचा - पंचकुलामधील गौशाळेत गेल्या 24 तासांत 70 गायींचा मृत्यू