एकीकडे महासत्तांची धडपड कायम असताना, न्युझीलंड यशस्वीपणे कोविड-19 शी लढा देत आहे. याचे सारे श्रेय पंतप्रधान जेसिंडा आर्डर्न यांना जाते. त्यांच्या ठायी असलेल्या कार्यक्षमता आणि दुरदृष्टीमुळे देशाचे कोरोना महामारीपासून संरक्षण झाले आहे. एकीकडे त्या लॉकडाऊनचे कडक उपाय राबवित आहेत, तर दुसरीकडे त्या स्वतःच्या लोकांची काळजीदेखील घेत आहेत.
न्युझीलंडमध्ये कोविड-19 चे पहिला रुग्ण 28 फेब्रुवारीला सापडला होता. इराणहून प्रवास करणाऱ्या महिलेस या विषाणूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले होते. जेसिंडा यांनी तातडीने कृती केली. आंतरराष्ट्रीय प्रवाशांना थेट विलगीकरण केंद्रांवर हलविण्याचा निर्णय झाला. मागील काही दिवसांमध्ये परदेशातून आलेल्या व्यक्ती शोधण्याचे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. अधिकाऱ्यांनी संसर्ग झालेल्या व्यक्तींचे संपर्क शोधण्यास सुरुवात केली. परिणामी, महामारीचा उद्रेक होण्यापूर्वी सरकारने परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.
आवश्यक ती काळजी घेऊनदेखील नवा कोरोना विषाणू धोकादायक रितीने सर्वत्र पसरत आहे. जेसिंडा यांनी आणखी उपाययोजना केल्या आणि नागरिकांना 15 मार्चपासून पुढे 14 दिवस घरांमध्ये बंदिस्त राहण्यास सांगितले. हा कालावधी संपण्यापूर्वीच त्यांनी 26 मार्चपासून देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली. नागरिकांनी त्यांच्या या निर्णयास पाठिंबा दिला. लोकांनी बंदिस्ततेच्या नियमांचे काटेकोर पालन केले आहे. तेव्हापासून, प्रकरणांच्या संख्येत सातत्याने घट झाली आहे. त्या विषाणूच्या उद्रेकाच्या टप्प्यांचा जोरदारपणे पाठपुरावा करीत आहेत आणि त्यादृष्टीने योजनेची आखणी करीत आहेत. सरकारने विषाणूच्या केंद्रबिंदूंची विभागणी केली असून या भागांमध्ये विशेष धोरणे राबविली जात आहेत.
लॉकडाऊनदरम्यान अत्यावश्यक सेवा उपलब्ध असतील हे त्यांनी पाहिले. नागरिकांच्या सहकार्यामुळे देशाला विषाणूशी झुंज देणे शक्य झाले. न्युझीलंडमध्ये मोठ्या प्रमाणावर चाचण्या करण्यात येत आहेत आणि नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण केली जात आहे. न्युझीलंडमधील कोविड-19 ने ग्रस्त असलेल्या सक्रिय रुग्णांचा आकडा 1349 आहे. यापैकी, 417 रुग्ण पुर्णपणे बरे झाले आहेत. संसर्गामुळे केवळ चार लोकांचा मृत्यू झाला आहे. विषाणू प्रसाराचा दरदेखील कमी आहे. विषाणूचा उद्रेक रोखण्यासाठी जेसिंडा यांनी सुरुवातीला केलेल्या प्रयत्नांना आता फळ मिळू लागले आहे.
काही महिन्यांपुर्वी जेसिंडा यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत आपल्या लहान बाळासमवेत उपस्थित राहून इतिहास घडवला होता. सध्या असलेल्या भीषण परिस्थितीतदेखील त्या एखाद्या आईप्रमाणे नागरिकांची काळजी घेत आहेत. नागरिकांना जीवनावश्यक वस्तू किंवा आणीबाणीच्या साहित्याची कमतरता कधीही भासत नाही. या महामारीदरम्यान लहान मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी सरकारकडून बाल साहित्यास प्रोत्साहन दिले जात आहे. जेंसिंडा यांनी स्वतःदेखील काही कॉमिक्स आणि गोष्टीच्या पुस्तकांचे समर्थन केले आहे.