नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम 370 रद्द करण्यात आल्यानंतर भारत-पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे. पाकिस्तान कर्तारपूर कॉरिडॉरचे उद्घाटन येत्या ९ नोव्हेंबरला करणार आहे. पाकिस्ताने या उद्घाटन समांरभासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांना आमंत्रण दिले होते. त्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानला जाण्यासाठी परराष्ट्र मंत्रालय आणि पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना परवानगी मागितली आहे.
-
Congress leader Navjot Singh Sidhu writes to External Affairs Minister, S Jaishankar requesting permission to visit Pakistan, for the inauguration of #KartarpurCorridor pic.twitter.com/BBiykz2Jrp
— ANI (@ANI) November 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congress leader Navjot Singh Sidhu writes to External Affairs Minister, S Jaishankar requesting permission to visit Pakistan, for the inauguration of #KartarpurCorridor pic.twitter.com/BBiykz2Jrp
— ANI (@ANI) November 2, 2019Congress leader Navjot Singh Sidhu writes to External Affairs Minister, S Jaishankar requesting permission to visit Pakistan, for the inauguration of #KartarpurCorridor pic.twitter.com/BBiykz2Jrp
— ANI (@ANI) November 2, 2019
'मला पाकिस्तानकडून कर्तारपूर कॉरिडॉर उद्घाटन समांरभात उपस्थिती लावण्यासाठी आमंत्रण देण्यात आले आहे. एक शीख म्हणून, या ऐतिहासिक प्रसंगी मला आमचे महान गुरु बाबा नानक यांना नमन करण्याची संधी मिळत आहे. हा माझ्यासाठी हा मोठा सन्मान आहे',असे सिद्धूने परराष्ट्र मंत्रालयाला पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
पाकिस्तानचे खासदार फैसल जावेद यांनी इम्रान खान यांच्या आदेशानंतर सिद्धू यांना फोनवरून उद्घाटन समांरभात सामिल होण्याचे आमंत्रण दिले होते. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी दुसऱ्या देशात जाण्यासाठी प्रक्रियेनुसार राजकीय मंजुरी घ्यावी लागेल असे स्पष्ट केले होते.
यापुर्वीही गेले होते सिद्धू पाकिस्तानात-
इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्याला नवज्योत सिंग सिद्धू यांनी उपस्थिती लावली होती. तिथे पाकिस्तानचे लष्कर प्रमुख कमर जावेद बाजवा यांची गळाभेट घेतली. त्यांच्या या भेटीमुळे फार मोठा गदारोळ माजला होता. भाजपसह इतर अनेक पक्षांनी सिद्धूवर टीका केली होती.