चंदीगढ - माजी क्रिकेटपटू आणि राजकीय नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी नवीन युट्युब चॅनेल सुरू केले आहे. या चॅनेलवर सिद्धू राजकीय घडामोडींवरील चर्चेचे व्हिडिओ अपलोड करणार असल्याचे त्यांनी सांगतिले. गेल्या वर्षी जुलैमध्ये नवज्योत सिद्धू यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
नवज्योत सिंग सिद्धू यांनी लाँच केलेल्या युट्युब चॅनेलचे 'जीतेगा पंजाब' किंवा 'पंजाब विल विन' असे नाव आहे. तब्बल 9 महिने विचार आणि आत्मचिंतन केल्यानंतर लोकांशी संवाद साधण्यासाठी आणि पंजाबमधील जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी युट्युब चॅनेल सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. सिद्धू चॅनेलच्या माध्यमातून लोकांच्या समस्या आणि पंजाब संबधित मुद्दे मांडणार आहेत.
गुरु नानक यांनी दाखवलेल्या शांती, बंधुत्व, सहिष्णुता आणि प्रेम या तत्त्वापासून चॅनल प्रेरित आहे. पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी मतभेद झाल्याने त्यांनी राजीनामा दिला होता. तेव्हापासून ते सोशल मीडियावरही जास्त सक्रिय नव्हते.