नवी दिल्ली - नैसर्गिक वायूच्या किंमती मंगळवारी तब्बल २६ टक्क्यांनी गडगडल्या. सन २०१४ मध्ये किंमतीच्या आधाराचे सूत्र बनवल्यानंतरची ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे. याचा परिणाम हा सीएनजी आणि घरगुती गॅसच्या किमतींवर होण्याची शक्यता आहे. तर, ओएनजीसीसारख्या निर्मात्यांचा महसुलामध्येही मोठी घट होणार आहे.
तेल मंत्रालयाच्या पेट्रोलियम नियोजन व विश्लेषण कक्षाने (पीपीएसी) म्हटले आहे की, भारतातील विद्यमान गॅस उत्पादनाच्या मोठ्या प्रमाणात ब्रिटिश औष्णिक युनिटची किंमत 1 एप्रिलपासून सुरू होणार्या सहा महिन्यांच्या कालावधीत प्रति दशलक्ष 2.39 डॉलर असेल, ती आताच्या तुलनेत 3.23 डॉलरपेक्षा कमी आहे.
सन २०१४ नंतर गेल्या सहा महिन्यांतील ही दुसरी घसरण आहे. डिप्सियासारख्या कठीण क्षेत्रातून तयार होणाऱ्या वायूची किमतीही आता ८.४३ अमेरिकन डॉलर प्रति एमएमबीटीयूवरुन ५.५१ डॉलर प्रति एमएमबीटीयू झाली आहे.
नैसर्गिक वायूंचा वापर हा खत कीटकनाशक तयार करण्यासाठी, वीज निर्मिती, ऑटोमोबाईलमध्ये इंधन म्हणून वापरण्यात येणाऱ्या सीएनजीसाठी तसेच स्वयंपाकघरातील गॅससाठी केला जातो. या वायूचे दर दरवर्षी सहा महिन्यानंतर म्हणजे 1 एप्रिल आणि 1 ऑक्टोबर या दरम्यान निश्चित केल्या जातात.