नवी दिल्ली - पंतप्रधान पदाच्या दुसऱ्या कार्यकाळासाठी नरेंद्र मोदी आज सायंकाळी 7 वाजता राष्ट्रपती भवनात शपथ घेतील. यावेळी, बिस्मटेकमधील देशांच्या प्रमुखांसह एकूण 8 देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. शपथविधी सोहळ्यात एकून 24 कॅबिनेट तर, 33 केंद्रीय राज्यमंत्र्यांनी पदाची आणि गोपनियतेची शपथ घेतली.
- 8.49 - शपथविधी सोहळा संपन्न
- पंतप्रधान मोदींसह 24 कॅबिनेट मंत्री आणि 33 जणांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्रीपदाची शपथ
- 8.57 - देवश्री चौधरी यांनी घेतली शपथ, रायगंज (पश्चिम बंगाल) येथून खासदार, 18 व्या वर्षापासून राजकारणात, 100 पेक्षा अधिक चित्रपटात काम, 40 पेक्षा अधिक पुरस्कार
- 8.55 - कैलाश चौधरी यांनी घेतली शपथ, बाडमेर (राजस्थान) येथूून खासदार, भाजपचे राजस्थानातील मोठे नेते
- 8.53 - प्रतापचंद्र सारंगी यांनी घेतली शपथ, बालासोर (ओडिशा) येथून खासदार, गरीब खासदार म्हणून ओळख, सायकलवरुन करतात प्रवास
- 8.51 - सोमेश्वर तेली यांनी घेतली शपथ, पहिल्यांदाच मिळाले मंत्रीपद, दिब्रुगड (आसाम) येथून खासदार
- 8.49 - सोमप्रकाश यांनी घेतली शपथ
- 8.47 - रेणुका सिंह यांनी घेतली शपथ, सरगुजा (छत्तीसगड) येथून खासदार, कोट्यधीश खासदार म्हणून ओळख,
- 8.45 - व्ही मुरलीधरन यांनी घेतली शपथ
- 8.43 - रतनलाल कटारिया यांनी घेतली शपथ, अंबाला मतदारसंघाचे खासदार, कविता, शायरी लिहिण्याचा छंद
- 8.41 - नित्यानंद राय यांनी घेतली शपथ
- 8.39 - सुरेश अंगडी यांनी घेतली शपथ, बेळगाव (कर्नाटक) येथून 4 वेळा खासदार, लिंगायत समाजाचे नेते म्हणून ओळख,
- 8.37 - अनुराग ठाकूर यांनी घेतली शपथ
- 8.35 - संजय धोत्रे यांनी घेतली शपथ, अकोला (महाराष्ट्र) येथून खासदार
- 8.33 - संजीव कुमार बालियान यांनी घेतली शपथ
- 8.31 - बाबुल सुप्रियो यांनी घेतली शपथ, आसनसोल (पश्चिम बंगाल) येथून खासदार
- 8.29 - साध्वी निरंजन ज्योती यांनी घेतली शपथ, फतेहपूर (उत्तरप्रदेश) येथून खासदार
- 8.27 - रामदास आठवले यांनी घेतली शपथ, पंढरपूर येथून 1999 साली खासदार, आरपीआय पक्षाचे अध्यक्ष, सामाजिक न्यायमंत्री म्हणून मोदी मंत्रिमंडळात पाहिले आहे काम
- 8.25 - पुरुषोत्तम रुपाला यांनी घेतली शपथ
- 8.23 - जी किशन रेड्डी यांनी घेतली शपथ, सिकंदराबाद (तेलंगाणा) येथून खासदार
- 8.21 - रावसाहेब दानवे यांनी घेतली शपथ, जालना येथून सलग ५ वेळा खासदार, महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष, सरपंच ते केंद्रीय मंत्री असा प्रवास
- 8.20 - कृष्णपाल गुज्जर यांनी घेतली शपथ, फरीदाबाद (हरियाणा) येथून खासदार, सलग दुसऱ्यांदा मोदी मंत्रिमंडळात वर्णी
- 8.19 - व्ही. के सिंग यांनी घेतली शपथ, परराष्ट्र मंत्री म्हणून पाहिले आहे काम, सलग दुसऱ्यांदा मोदी मंत्रिमंडळात वर्णी
- 8.17 - अर्जून मेघवाल यांनी घेतली शपथ, बीकानेर येथून खासदार, दुसऱ्यांदा मोदी मंत्रिमंडळात वर्णी, जल संसाधन आणि गंगा संधारण मंत्री म्हणून पाहिले आहे काम.
- 8.15 - अश्निनीकुमार चौबे यांनी घेतली शपथ
- 8.13 - फग्गन सिंह फुलस्ते यांनी घेतली शपथ
- 8.11 - मनसुख मंडाविय यांनी घेतली शपथ, अभाविपचे सदस्य म्हणून काम, मंत्रिमंडळात दुसऱ्यांदा वर्णी
- 8.09 - हरजितसिंग पुरी यांनी घेतली शपथ
- 8.06 - राज कुमार सिंग यांनी घेतली शपथ
- 8.04 - प्रल्हाद पटेल यांनी घेतली शपथ, दमोह येथून पाचव्यांदा खासदार
- 8.02 - किरण रिजीजू यांनी घेतली शपथ
- 8.00 - जितेंद्र सिंह यांनी घेतली शपथ, उधमपूर येथून खासदार, भाजप कार्यकारणीचे सदस्य, जम्मू-काश्मीरमध्ये भाजप वाढीस मोठा हात.
- 7.58 - श्रीपाद नाईक यांनी घेतली शपथ, गोव्यातून सलग 5 वेळा खासदार, मोदी मंत्रिमंडळात सलग दुसऱ्यांदा वर्णी
- 7.57 - राव इंद्रजीत सिंह यांनी घेतली शपथ, गुडगाव येथून खासदार
- 7.56 - संतोष गंगवार यांनी घेतली शपथ
- केंद्रीय राज्यमंत्री शपथविधीला सुरुवात
- 7.54 - गजेंद्र सिंह शेखावत, जोधपूरचे खासदार, दुसऱ्यांदा मंत्रिमंडळात वर्णी
- 7.52 - गिरीराज सिंह यांनी घेतली शपथ
- 7.49 - शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी पहिल्यांदाच घेतली मंत्रिपदाची शपथ, दक्षिण मुंबई येथून खासदार, 30 वर्षे एमटीएनएल कामगार संघाचे अध्यक्ष.
- 7.46 - महेंद्रनात पांडे यांनी घेतली शपथ
- 7.45 - प्रल्हाद जोशी यांनी घेतली शपथ, धारवाड येथून खासदार
- 7.43 - मुख्तार अब्बाद नक्वी यांनी घेतली शपथ, अमित शाह यांचे विश्वासू, मुस्लीम मते भाजपकडे वळवण्यात मोठा हात, अल्पसंख्यांक मंत्री म्हणून पाहिले आहे काम
- 7.40 - धर्मेंद्र प्रधान यांनी घेतली शपथ
- 7.38 - पियुष गोयल यांनी घेतली शपथ, रेल्वेमंत्री म्हणून पाहिले आहे काम
- 7.37 - प्रकाश जावडेकर यांनी घेतली शपथ, 2014 साली पर्यावरणमंत्री, 2016 साली मनुष्यबळ विकासमंत्री, भाजपचे निष्ठावंत म्हणून ओळख
- 7.36 - डॉ. हर्षवर्धन यांनी घेतली शपथ
- 7.34 - स्मृती इराणी यांनी घेतली शपथ
- 7.32 - अर्जून मुंडा यांनी घेतली शपथ
- 7.29 - रमेश पोखरियाल यांनी घेतली शपथ
- 7.27 - एस. जयशंकर यांनी घेतली शपथ
- 7.25 - थावरचंद गेहलोत यांनी घेतली शपथ
- 7.24 - हरसिमरत कौर यांनी घेतली शपथ
- 7.21 - रवीशंकर प्रसाद यांनी घेतली शपथ
- 7.19 - नरेंद्र सिंग तोमर यांनी घेतली शपथ
- 7.17 - रामविलास पासवान यांनी घेतली शपथ, मोदींचे विश्वासू म्हणून ओळख, लोक जनशक्ती पक्षाचे संस्थापक, दाजीपूर (बिहार) येथून खासदार. 2014 साली श्रम कल्याणमंत्री म्हणून मोदी मंत्रिमंडळात.
- 7.15 - निर्मला सीतारमण यांनी घेतली शपथ, सप्टेंबर 2017 साली भारताच्या पहिल्या महिला संरक्षणमंत्री म्हणून नियुक्त. माजी भाजप प्रवक्त्या.
- 7.10 - डी व्ही सदानंद गौडा यांनी घेतली शपथ, उत्तर बंगळुरू येथून खासदार, कर्नाटकातील भाजपचे मोठे नेते म्हणून ओळख, 2014 साली रेल्वेमंत्री म्हणून घेतली होती शपथ
- 7.09 - नितीन गडकरी यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, नागपूर येथून खासदार, 2014 साली रस्ते वाहतुक, जलस्त्रोत आणि गंगा संवर्धन मंत्री म्हणून नियुक्त, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष.
- 7.07 - अमित शाहांनी घेतली मंत्रिपदाजी शपथ, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, गांधीनगर येथून खासदार
- 7.06 - राजनाथ सिंह यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ, लखनऊ मतदारसंघातून खासदार, वाजपेयींचे निष्ठावंत म्हणून ओळख. 2014 च्या मंत्रिमंडळात केंद्रीय गृहमंत्री.
- केंद्रीय कॅबिनेट मंत्री शपथविधीला सुरुवात
- 7.05 - राष्ट्रपतींनी पदाची आणि गोपनियतेची नरेंद्र मोदींना दिली शपथ
- 7.05 - मै नरेंद्र दामोदरदास मोदी... नरेंद्र मोदी यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली पंतप्रधानपदाची शपथ, देशाचे १५ वे पंतप्रधान म्हणून नियुक्त
- 7.00 - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे आगमन
- 6.55 - राष्ट्रपती भवन येथे नरेंद्र मोदींचे आगमन
- 6.50 - नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनकडे रवाना
- 6.44 - सुषमा स्वराज शपथ घेणार नाहीत.
- 6.43 - सुषमा स्वराज पाहुण्यांच्या रांगेत.
- 6.40 - सुषमा स्वराज यांचे राष्ट्रपती भवन येथे आगमन
- 6.35 - राष्ट्रपती भवन येथे उद्धव ठाकरेंचे आगमन
- 6.30 - राहुल गांधी आणि सोनिया गांधी शपथविधीला उपस्थित
- 6.25 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल शपथविधीला हजर.
- 6.23 - जनता दलाची शपथविधीतून माघार, नितीश कुमारांचे स्पष्टीकरण.
- 6.20 - माजी पंतप्रधान मनमोहनसिंग, माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्यासह अनेक दिग्गजांचे राष्ट्रपती भवनात आगमन.
- 6.18 - मोेदींच्या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
- 6.15 - महाराष्ट्रातून ७ जणांची मंत्रीपदासाठी नावे निश्चित
- 6.05 - जगभरातील अनेक दिग्गजांची राष्ट्रपती भवनात हजेरी.
- 6.00 - राष्ट्रपती भवनात अमित शाहंचे आगमन.
- 5.45 - राष्ट्रपती भवनात प्रमुख पाहुण्यांच्या आगमनाल सुरुवात.
- 5.25 - मोदींच्या निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक पार पडली. मोदींनी संभाव्य मंत्र्यांना दिला कानमंत्र.
महाराष्ट्रातून ७ मंत्र्यांनी घेतली शपथ
नितीन गडकरी, पियुष गोयल, रावसाहेब दानवे, प्रकाश जावडेकर, रामदास आठवले, अरविंद सावंत, संजय धोत्रे यांनी शपथ घेतली.