ETV Bharat / bharat

नंदा देवी : ७ विदेशी गिर्यारोहकांचे मृतदेह बेस कँप २ वर आणले - mountaineers

१३ मे रोजी ब्रिटनचे नागरिक मार्टिन मोरिन, रिचर्ड प्याने, रूपर्ट वेवेल, जोन चार्लीस मॅकलर्न, अमेरिकेचे रोनाल्ड बीमेल, अॅन्थोनी सुडेकम, ऑस्ट्रेलियाची महिला गिर्यारोहक रुथ मॅकन्स आणि आयएमएफचे लायजनिंग ऑफिसर चेतन पांडेय हे मुनस्यारी येथून नंदा देवी ईस्टला निघाले होते.

नंदा देवी
author img

By

Published : Jul 2, 2019, 11:50 PM IST

पिथौरागड - इंडो-तिबेटन बॉर्डर पोलिसांनी (आयटीबीपी) यांनी शोधून काढलेले ७ गिर्यारोहकांचे मृतदेह नंदा देवी बेस कॅम्प २ वर आणण्यात यश आले आहेत. समुद्रसपाटीपासून २१ हजार फुटांवर हे मृतदेह सापडले होते. उत्तराखंड येथील नंदा देवी ईस्ट क्षेत्रात १७ हजार फुटांच्या उंचीवर सध्या हे मृतदेह आणण्यात आले आहेत. हे मृतदेह १५ हजार २५० फुटांवरील बेस कॅम्प १ वर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जवळजवळ १५ दिवसांच्या संघर्षानंतर आयटीबीपी पथकाला हे मृतदेह खाली आणण्यात यश आले आहे. वातावरण चांगले राहिल्यास १ ते २ दिवसांत सर्व मृतदेह हेलिकॉप्टरने जिल्हा मुख्यालयात आणण्यात येतील. आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक कुमार पांडेय यांनी हे पथक मृतदेहांना खालील बेस कॅम्पपर्यंत आणण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले.

आयटीबीपीच्या द्वितीय कमांडचे अधिकारी आणि एव्हरेस्ट विजेता रतन सिंह सोनाल यांच्या नेतृत्वाखाली १८ सदस्यीय टीमने नंदा देवी ईस्ट येथे हरवलेल्या ८ गिर्यारोहकांपैकी ७ जणांचे मृतदेह २३ जूनला शोधून काढले होते. सर्व मृतदेह १७ हजार ८०० फुटांवर असलेल्या अॅडव्हान्स कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. प्रत्येक मृतदेहाचे वजन ८० ते ९० किलोंच्या आसपास होते. सर्व मृतदेह कॅम्पपर्यंत आणण्यासाठी आयटीबीपीच्या हिमवीरांना अत्यंत खडतर परिश्रम घ्यावे लागले.

याच सुमारास नंदा देवी ईस्टमध्ये हवामान खराब झाल्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवणे हेही आव्हान ठरले होते. आयटीबीपीने दिलेल्या माहितीनुसार, हे अभियान अशा प्रकारचे जगातील पहिले आणि तांत्रिकदृष्ट्या सर्वांत कठीण अभियान होते.

१३ मे रोजी ब्रिटनचे नागरिक मार्टिन मोरिन, रिचर्ड प्याने, रूपर्ट वेवेल, जोन चार्लीस मॅकलर्न, अमेरिकेचे रोनाल्ड बीमेल, अॅन्थोनी सुडेकम, ऑस्ट्रेलियाची महिला गिर्यारोहक रुथ मॅकन्स आणि आयएमएफचे लायजनिंग ऑफिसर चेतन पांडेय हे मुनस्यारी येथून नंदा देवी ईस्टला निघाले होते.

२६ मे रोजी हे पथक अॅव्हलांचच्या तडाख्यात सापडल्याने बेपत्ता झाले होते. या पथकातील ७ जणांचे मृतदेह सर्च अॅण्ड रेस्क्यू टीमने शोधून काढले आहेत. तर, वातावरण बिघडले असल्याने आठव्या गिर्यारोहकाचा शोध सध्या थांबवण्यात आला आहे. हवामान ठीक झाल्यानंतर आठव्या गिर्यारोहकाचा मृतदेह शोधण्यासाठी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येईल.

Intro:Body:

-----------------

नंदा देवी : ७ विदेशी गिर्यारोहकांचे मृतहेद बेस कँप २ वर आणले

पिथौरागड - इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीसांनी (आयटीबीपी) यांनी शोधून काढलेले ७ गिर्यारोहकांचे मृतदेह नंदा देवी बेस कॅम्प २ वर आणण्यात यश आले आहे. समुद्रसपाटीपासून २१ हजार फुटांवर हे मृतदेह सापडले होते. उत्तराखंड येथील नंदा देवी ईस्ट क्षेत्रात १७ हजार फुटांच्या उंचीवर सध्या हे मृतदेह आणण्यात आले आहेत. हे मृतदेह १५ हजार २५० फुटांवरील बेस कॅम्प १ वर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

जवळजवळ १५ दिवसांच्या संघर्षानंतर आयटीबीपी टीमला हे मृतदेह खाली आणण्यात यश आले आहे. वातावरण चांगले राहिल्यास १ ते २ दिवसांत सर्व मृतदेह हेलिकॉप्टरने जिल्हा मुख्यालयात आणण्यात येतील. आयटीबीपीचे प्रवक्ते विवेक कुमार पांडेय यांनी ही टीम मृतदेहांना खालील बेस कॅम्पपर्यंत आणण्याच्या प्रयत्नात असल्याचे सांगितले.

आयटीबीपीच्या द्वितीय कमांडचे अधिकारी आणि एव्हरेस्ट विजेता रतन सिंह सोनाल यांच्या नेतृत्वाखाली १८ सदस्यीय टीमने नंदा देवी ईस्ट येथे हरवलेल्या ८ गिर्यारोहकांपैकी ७ जणांचे मृतदेह २३ जूनला शोधून काढले होते. सर्व मृतदेह १७ हजार ८०० फुटांवर असलेल्या अॅडव्हान्स कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. प्रत्येक मृतदेहाचे वजन ८० ते ९० किलोंच्या आसपास होते. सर्व मृतदेह कॅम्पपर्यंत आणण्यासाठी आयटीबीपीच्या हिमवीरांना अत्यंत खडतर परिश्रम घ्यावे लागले.

याच सुमारास नंदा देवी ईस्टमध्ये हवामान खराब झाल्याने रेस्क्यू ऑपरेशन राबवणे हेही आव्हान ठरले होते. आयटीबीपीने दिलेल्या माहितीनुसार, हे अभियान अशा प्रकारचे जगातील पहिले आणि तांत्रिकदृष्ट्या सर्वांत कठीण अभियान होते.

१३ मे रोजी ब्रिटनचे नागरिक मार्टिन मोरिन, रिचर्ड प्याने, रूपर्ट वेवेल, जोन चार्लीस मॅकलर्न, अमेरिकेचे रोनाल्ड बीमेल, अॅन्थोनी सुडेकम, ऑस्ट्रेलियाची महिला गिर्यारोहक रुथ मॅकन्स आणि आयएमएफचे लायजनिंग ऑफिसर चेतन पांडेय हे मुनस्यारी येथून नंदा देवी ईस्टला निघाले होते.

२६ मे रोजी हे पथक अॅव्हलांचच्या तडाख्यात सापडल्याने बेपत्ता झाले होते. या पथकातील ७ जणांचे मृतदेह सर्च अॅण्ड रेस्क्यू टीमने शोधून काढले आहेत. तर, वातावरण बिघडले असल्याने आठव्या गिर्यारोहकाचा शोध सध्या थांबवण्यात आला आहे. हवामान ठीक झाल्यानंतर आठव्या गिर्यारोहकाचा मृतदेह शोधण्यासाठी पुन्हा शोध मोहीम राबवण्यात येईल.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.