नवी दिल्ली - देशाला हादरवून टाकणाऱ्या मुझफ्फरपूर आश्रयगृह प्रकरणातील १९ आरोपींवरील गुन्हा आज सिद्ध झाला. दिल्लीतील एका न्यायालयाने याबाबत निर्णय दिला. यावेळी एका आरोपीला निर्दोष ठरवण्यात आले. याआधी ही सुनावणी १४ जानेवारीला होणार होती, मात्र दिल्ली न्यायालयाने ती पुढे ढकलत आजची तारीख दिली होती. या आरोपींच्या शिक्षेवर आता २८ जानेवारीला सुनावणी होणार आहे.
-
Bihar's Muzaffarpur shelter home case: The court has listed the matter for argument on quantum of sentence on January 28 https://t.co/pVbhtj1vu6
— ANI (@ANI) 20 January 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Bihar's Muzaffarpur shelter home case: The court has listed the matter for argument on quantum of sentence on January 28 https://t.co/pVbhtj1vu6
— ANI (@ANI) 20 January 2020Bihar's Muzaffarpur shelter home case: The court has listed the matter for argument on quantum of sentence on January 28 https://t.co/pVbhtj1vu6
— ANI (@ANI) 20 January 2020
२०१९मध्ये ३० सप्टेंबरलाच अतिरिक्त सत्र न्यायाधीश सौरभ कुलश्रेष्ठ यांनी या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता. मात्र, १४ नोव्हेंबरला झालेल्या वकीलांच्या संपामुळे हा निर्णय जाहीर करण्याची तारीख पुढे ढकलण्यात आली. त्यानंतर, १२ डिसेंबरला कुलश्रेष्ठ हे सुट्टीवर असल्या कारणाने याबाबतचा निर्णय जाहीर होऊ शकला नव्हता.
२१ आरोपींविरोधात सबळ पुरावे..
सुनावणीदरम्यान सीबीआयने न्यायालयात सांगितले होते, की पीडित मुलींनी दिलेली माहिती पाहता, २१ आरोपींविरोधात सबळ पुरावे आपल्याकडे आहेत. तर आरोपींकडून असा आरोप करण्यात आला होता, की सीबीआय या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास करत नाही. ही घटना घडल्याची ना कोणती विशिष्ट तारीख आहे, ना वेळ, ना स्थळ, हा सर्व खटला हवेतच सुरू आहे.
फेब्रुवारी २०१९ मध्ये झाली होती सुनावणी सुरू..
२५ फेब्रुवारी २०१९ला या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली होती. सर्वोच्च न्यायालयाने ७ फेब्रुवारीला हे प्रकरण बिहारमधून दिल्लीच्या साकेत न्यायालयात हस्तांतरित केले होते. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण ६ महिन्यांमध्ये निकालात काढण्याचे निर्देश साकेत न्यायालयाला दिले होते.
अत्याचार आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हे सिद्ध..
या आरोपींविरोधात लैंगिक शोषण, पॉक्सो कायद्यातील कलम ३, ५ आणि ६ यांसह अन्य कलमांतर्गत गुन्हे सिद्ध झाले आहेत. आरोपींमध्ये मुख्य आरोपी ब्रजेश ठाकूर, शाइस्ता प्रवीण उर्फ मधू, मोहम्मद साहिल, ब्रजेश ठाकूरचे काका रामानुज, बाल कल्याण समितीचे माजी अध्यक्ष दिलीप वर्मा, आश्रयगृहाचे व्यवस्थापक रामाशंकर सिंह, अश्विनी कुमार आणि कृष्णकुमार राम यांचा समावेश आहे.
हेही वाचा : निर्भया प्रकरण : आरोपी पवन गुप्ताची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली!