वारणसी - आज देशभरात ईद साजरी करण्यात आली आहे. उत्तरप्रदेशातील वाराणसीमध्येही मुस्लीम बांधवांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या फोटोला शिरखुर्मा भरवत ईद साजरी केली. आज योगींचा वाढदिवसही असल्याने त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
आज देशभरात ईद उत्साहात साजरी करण्यात येत आहे. तसेच उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आज वाढदिवसही आहे. याचे औचित्य साधत मुस्लीम बांधवांनी योगींच्या प्रतिमेला शिरखुर्मा हा खास इस्लामी पदार्थ भरवला.
यावेळी मुस्लीम बांधवांनी "गंगा-जमुना तहजीब जिंदाबाद", अशा घोषणा दिल्या. तसेच मुख्यंमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. आज ईद असून योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवसही आहे. हा दुग्धशर्करा योग असून आम्ही खूप खूश आहोत. त्यासाठीच आम्ही त्यांना शिरखुर्मा भरवला असून त्यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना केली असल्याचे शेख मोहम्मद आसिफ यांनी सांगितले.