ETV Bharat / bharat

राम मंदिर भूमिपूजन: एकोप्याचा संदेश देत मुस्लिम कुटुंब पेटवणार 501 दिवे - गंगा जमुनी तेहजीब

गंगा-जमुनी-तेहझीब ही पुर्वापार चालत आलेली हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांच्या एकोप्याचा संदेश देणारी संस्कृती आहे. दोन्ही धर्मांची वैशिष्ट्ये एकमेकांत असून प्रेमाने दोन्ही धर्मांनी एकत्र राहण्याचा संदेश यातून देण्यात येतो.

बाबुल खान
बाबुल खान
author img

By

Published : Jul 29, 2020, 2:51 PM IST

अयोध्या - संपूर्ण अयोध्या शहर राम मंदिराच्या भूमीपूजनासाठी सज्ज झाले असून या सोहळ्याची जोरदार तयारी सुरु आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते चांदीची वीट रचून पाया भरण्यात येणार आहे. अयोध्येत या दिनी दिपोत्सवही साजरा करण्यात येणार आहे. भूमीपूजनाच्या दिवशी हिंदू मुस्लिम ऐकोप्याचा संदेश एक मुस्लिम कुटुंब 501 दिवे पेटवून देणार आहे. पूर्वापार चालत आलेल्या गंगा-जमुनी-तेहझीब या परंपरेचे पालन हे मुस्लिम कुटुंब करणार आहे.

गंगा-जमुनी-तेहझीब ही पुर्वापार चालत आलेली हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांच्या एकोप्याचा संदेश देणारी संस्कृती आहे. दोन्ही धर्मांची वैशिष्ट्ये एकमेकांत असून प्रेमानेे दोन्ही धर्मांनी एकत्र राहण्याचा संदेश यातून देण्यात येतो. बाबुल खान यांच्या कुटुंबियांकडून या परंपरेचे पालन करण्यात येत आहे. बाबुल खान यांनी राम मंदिर अभियानालाही पाठिंबा दिला होता. आता 5 ऑगस्टला दिपोत्सव साजरा करण्याची त्यांची तयारी सुरु आहे.

ईटीव्ही भारतशी बोलताना बाबुल खान म्हणाले, कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे घरातच मातीचे दिवे पेटवून राम मंदिर भूमीपूजनाचा उत्सव साजरा करणार आहे. 5 ऑगस्ट हिंदू मुस्लीम एकतेचे प्रतिक बनेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, राम जन्मभूमीच्या पार्श्वभूमीवर अयोध्येतील सर्व मंदिरांची स्वच्छता करण्याचे आदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिले होते. तसेच मंदिर परिसरात दिवे लावण्यास त्यांनी सांगितले होते. राम जन्मभूमीच्या परिसरातील मशिदीतून धार्मिक संदेशही देण्यात येत आहे. राम मंदिर भूमीच्या परिसरात 8 मशिदी आणि 2 दर्गा देखील आहेत. या सर्व मशिदीमध्ये नमाज आणि उर्स हे कार्यक्रम पार पडतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.