ETV Bharat / bharat

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी रोखले

author img

By

Published : Jun 11, 2020, 4:02 PM IST

महामार्गात गेलेल्या जमिनिचा सर्व शेतकऱ्यांना समान मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी दिल्ली-मेरठ महामार्गावर शेतकऱ्यांनी आज (गुरुवार) आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जात असलेल्या आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना मुरादनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Muradnagar cops stop Chandrashekhar Azad from visiting farmers
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जाणाऱ्या चंद्रशेखर आझाद यांना पोलिसांनी रोखले

गाजियाबाद - महामार्गात गेलेल्या जमिनीचा सर्व शेतकऱ्यांना समान मोबदला देण्यात यावा, या मागणीसाठी दिल्ली-मेरठ महामार्गावर शेतकऱ्यांनी आज (गुरुवार) आंदोलन केले. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जात असलेल्या आझाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रशेखर आझाद यांना मुरादनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्ली-मेरठ या महामार्गासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमीनी गेल्या आहेत त्यांना समान मोबदला दिला नाही. तसेच यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा आरोपही चंद्रशेखर यांनी केला.

या शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळाला पाहिजे, यासाठी चंद्रशेखर आझाद हे आग्रही आहेत. या आंदोलकांना पाठिंबा दर्शवण्यासाठी ते जात असताना पोलिसांनी त्यांना अडवले व ताब्यात घेतले. पोलीस शेतकऱ्यांचे समर्थ करु देत नसल्याचे वक्तव्य चंद्रशेखर यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना केले. सरकार मनमानी करत असून, शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचे आझाद म्हणाले. या आंदोलनादरम्यान, मुरादनगर परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिसांची फौैजफाटा होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.