ETV Bharat / bharat

26/11 मुंबई हल्ल्यातून वाचलेल्या तरुणीची मदतीसाठी उच्च न्यायालयात धाव - मुंबई 26/11 हल्ला न्यूज

देविका 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन (सीएसटी) येथे होती. लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अजमल आमिर कसाबने झाडलेल्या गोळ्या तिच्या उजव्या पायाला लागल्या होत्या. त्याने तिच्यासह इतरांवरही गोळीबार केला होता. तिच्यावर आतापर्यंत 6 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. जवळजवळ 6 महिन्यांपर्यंत ती अंथरुणावरच पडून होती.

देविका रोटावन
देविका रोटावन
author img

By

Published : Aug 26, 2020, 4:27 PM IST

मुंबई - 26/11 च्या मुंबई हल्ल्यात वाचलेल्या आणि प्रत्यक्षदर्शींपैकी एक असलेली देविका रोटावन सध्या मोठ्या आर्थिक अडचणीत आहे. तिने आर्थिक दुर्बल विभागाच्या (ईडब्ल्यूएस) योजनेत घर देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करण्याची विनंती सरकारकडे केली आहे. आपल्या कुटुंबासाठी घर मिळावे आणि शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आर्थिक तरतूद करावी, यासाठी तिने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या आठवड्यात हे प्रकरण सुनावणीसाठी सूचीबद्ध केले जाईल.

देविका 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन (सीएसटी) येथे होती. लष्कर-ए-तैयबाचा दहशतवादी अजमल आमिर कसाबने झाडलेल्या गोळ्या तिच्या उजव्या पायाला लागल्या होत्या. त्याने तिच्यासह इतरांवरही गोळीबार केला होता. तिच्यावर आतापर्यंत 6 शस्त्रक्रिया झाल्या आहेत. जवळजवळ 6 महिन्यांपर्यंत ती अंथरुणावरच पडून होती.

26/11 मुंबई हल्ल्यातून वाचलेल्या तरुणीची मदतीसाठी उच्च न्यायालयात धाव

रुग्णालयात असतानाच्या काळात अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी तिला व तिच्या कुटुंबाला ईडब्ल्यूएस योजनेंतर्गत रहिवासी निवासस्थान देण्याचे आणि कसाब दोषी ठरल्यावर तिच्या शैक्षणिक खर्चाची तरतूद करण्याचे वचन दिले होते. मात्र अद्याप तसे घडलेले नाही, असे तिने सांगितले.

'मला विशेषत: लॉकडाऊन कालावधीनंतर त्रास होत आहे. मला महाराष्ट्र सरकारकडून पाठबळ हवे आहे. मला एक घर आणि सर्व सहाय्य देण्यात येईल, असे मला सरकारकडून सांगण्यात आले. पण अद्याप तसे झाले नाही,. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारकडून मला दहा लाख रुपयांची मदत मिळाली होती. हे पैसे माझ्या क्षयरोगाच्या (टीबी) माझ्या उपचारांसाठी वापरले होते. त्याबद्दल मी त्यांची आभारी आहे. मात्र, त्यापूर्वी मला दिलेली आश्वासने अद्याप पूर्ण झाली नाहीत,' असे देवीका रोटावन म्हणाली.

हेही वाचा - उत्तर प्रदेश : सावत्र आईने केली 10 वर्षांच्या मुलीची हत्या, चाकूचे तब्बल 15 वार

'माझी मागणी आहे की आमच्यासाठी - माझ्यासह माझ्या कुटुंबासाठी घराची व्यवस्था करावी. माझ्या घरमालकाने मला सांगितले आहे की, मी भाडे न देऊ शकल्यास मला दुसरे कोठे तरी घर शोधावे लागेल.' कसाबच्या खटल्याच्या वेळी, त्याच्याविरुद्ध साक्ष देण्यासाठी ती एक 'स्टार-साक्षीदार' होती. सत्र न्यायाधीशांनी त्याला दोषी ठरवण्यात तिच्या साक्षीचा मोठा उपयोग झाला. रोटावन यांनी तिला व तिच्या कुटुंबीयांना आश्वासनानुसार सरकारकडून काहीच मिळालेले नाही. शिवाय, तिला वैद्यकीय सेवेव्यतिरिक्त काही नुकसान भरपाई देण्यात आलेली नाही, असे तिने सांगितले आहे.

"माझे वडील एक ज्येष्ठ नागरिक असून ते अंथरुणाला खिळून आहेत. माझ्या भावाच्या पाठीच्या कण्यावर तीन शस्त्रक्रिया झाल्या असून नुकताच त्याला हर्निया झाल्याचे निदान झाले आहे. आता माझा घरमालक मला व माझ्या कुटुंबाला जबरदस्तीने खोली खाली करण्याची धमकावत ​​आहे. मी राज्याच्या मुख्य सचिवांना याविषयी लिहिले आहे. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. माझ्याकडे उत्पन्नाचा स्रोत नाही आणि नाईलाजास्तव मी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत मदतीची मागणी केली आहे,' असे ती म्हणाली.

26 नोव्हेंबर 2008 रोजी सुरू झालेला मुंबईवरील दहशतवादी हल्ला चार दिवस चालला. त्यात 166 जण ठार आणि 300 हून अधिक जण जखमी झाले होते. या भयानक हल्ल्यात नऊ दहशतवादी मारले गेले आणि एकटा वाचलेला दहशतवादी अजमल आमिर कसाब याला पकडले गेले आणि त्याला येरवडा येथील कारागृहात मृत्युदंड देण्यात आला. 2012 मध्ये पुण्यात येरवडा मध्यवर्ती कारागृहात त्याला फाशी देण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.