ETV Bharat / bharat

मुंबईच्या तरुणाचा इंदौरमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू - इंदौरच्या राजा बाग कॉलनीमधील घटना

मध्यप्रदेशमधील इंदौर येथे मुंबईच्या एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे.

मुंबईच्या तरुणाचा इंदौरमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू

author img

By

Published : Feb 17, 2020, 11:47 PM IST

इंदौर - मध्यप्रदेशमधील इंदौर येथे एक मोठी घटना घडली आहे. शहरामधील राजा बाग कॉलनीमध्ये मुंबईच्या एका तरुणाचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शहरातील जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मुंबईच्या तरुणाचा इंदौरमध्ये संशयास्पद परिस्थितीत मृत्यू

अन्नपूर्णा पोलीस स्टेशन परिसरातील राजा बाग कॉलनीमध्ये ही घडली आहे. तरुणाचे दीपक असे नाव असून तो मुंबई येथील रहिवासी आहे. आपल्या मैत्रीनीला भेटण्यासाठी 3 दिवसांपूर्वी मुंबई येथून इंदौरला आला होता. दोघेही दिवसभर शहरामध्ये फिरले. मात्र, घरी आल्यानंतर दीपकच्या छातीत दुखत होते, असे मैत्रिनीने सांगितले. इंदौरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाल्याची माहिती आहे. दरम्यान कुटुंबातील सदस्यांना यासंबधी माहिती देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.