मुंबई - गुजरात दशतवादी विरोधी पथकाने सोमवारी १९९३च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी मुनाफ हलारी मूसा याला अटक केली आहे. या साखळी बॉम्बस्फोटात 260 जणांचा मृत्यू, तर 700 जण जखमी झाले होते. गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने मुंबई विमानतळावर त्याला अटक केली.
मूसा पाकिस्तानी पास्टपोर्टवर प्रवास करत होता. दीड हजार कोटींच्या अंमलीपदार्थ तस्करीतही मुनाफ आरोपी आहे. बॉम्बस्फोट झाल्यानंतर तो दक्षिण आफ्रिकेत जाऊन लपला होता. १९९२ पासून सहा बॉम्बस्फोटाचे गंभीर आरोप त्यांच्यावर असून त्याला अजमेर बॉम्बस्फोटप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.