झाबुआ - मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात देवरीगढ गावात भिन्न जातीय व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध असल्याच्या आरोपावरून महिलेला पतीला खांद्यावर घेऊन चालण्याची शिक्षा देण्यात आली. ही महिला विशीतील असून तिला या लाजिरवाण्या आणि अपमानास्पद प्रकाराला सामोरे जावे लागले. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून हे गाव केवळ ३४० किलोमीटरवर आहे.
विवाहबाह्य संबंध असल्याच्या आरोपावरून महिलेला पतीला खांद्यावर घेऊन चालण्याची शिक्षा..
या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ही महिला तिच्या पतीला खांद्यावर घेऊन चालताना दिसत आहे. अत्यंत थकलेल्या अवस्थेत मोठ्या मुश्किलीने ती एक-एक पाऊल टाकताना दिसत आहे.
झाबुआ - मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात देवरीगढ गावात भिन्न जातीय व्यक्तीशी विवाहबाह्य संबंध असल्याच्या आरोपावरून महिलेला पतीला खांद्यावर घेऊन चालण्याची शिक्षा देण्यात आली. ही महिला विशीतील असून तिला या लाजिरवाण्या आणि अपमानास्पद प्रकाराला सामोरे जावे लागले. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून हे गाव केवळ ३४० किलोमीटरवर आहे.
धक्कादायक ! दुसऱ्या जातीच्या मुलाशी लग्न केल्याने महिलेला पतीला खांद्यावर घेऊन चालण्याची शिक्षा..
झाबुआ - मध्यप्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथील देवरीगढ गावात भिन्न जातीय मुलाशी लग्न केल्याबद्दल महिलेला पतीला खांद्यावर घेऊन चालण्याची शिक्षा देण्यात आली. ही महिला विशीतील असून या लाजिरवाण्या आणि अपमानास्पद प्रकारामुळे तिचे खच्चीकरण झाले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून हे गाव केवळ ३४० किलोमीटरवर आहे.
या प्रसंगाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ही महिला तिच्या पतीला खांद्यावर घेऊन चालताना दिसत आहे. अत्यंत थकलेल्या अवस्थेत मोठ्या मुश्किलीने ती एक-एक पाऊल टाकताना दिसत आहे. तिच्या आजूबाजूने चालणारे तिच्या गावातील काही पुरुष तिची हेटाळणी करताना तसेच, आरोळ्या ठोकताना दिसत आहेत. तसेच, तिला त्रास देण्याचा आनंद घेत काही वयोवृद्ध नाचतही आहेत. तिला दमल्यामुळे थोडा वेळही थांबू दिले जात नाही. तिच्या आजूबाजूचे लोक जोरजोरात शेरेबाजी आणि किंकाळ्या फाडून चालण्यास भाग पाडत आहेत.
पोलिसांनी ही घटना गांभीर्याने घेतली असून या महिलेचा अपमान करणाऱ्यांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक विनीत जैन यांनी याविषयी माहिती दिली. '२ आरोपींना अटक करण्यात आली आहेत. लवकरच या घटनेतील सर्व दोषींना अटक करण्यात येईल,' असे ते म्हणाले.
Conclusion: