भोपाळ : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या सासऱ्यांचे बुधवारी निधन झाले. भोपाळमधील नॅशनल हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. यानंतर मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी साधना सिंह रुग्णालयात दाखल झाले. यावेळी राज्य विधानसभेचे अध्यक्ष रामेश्वर शर्मा यांच्यासोबत अन्य नेतेही उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे सासरे घनश्यामदास मसानी हे ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी सुशीला देवी, तीन मुली आणि दोन मुले असा परिवार आहे.
सिंधिया-मिश्रांनी व्यक्त केला शोक..
भाजप नेते ज्योतिरादित्य सिंधिया, आणि राज्याचे गृहमंत्री डॉ. नरोत्तम मिश्रा यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे. देव त्यांच्या आत्म्याला शांती देओ, आणि त्यांच्या कुटुंबीयांना हा आघात सहन करण्याची शक्ती देओ अशा आशयाचे ट्विट यांनी व्यक्त केले.
-
मध्य प्रदेश के मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान जी के ससुर श्री घनश्याम दास रामकिशन मसानी जी के दुःखद निधन पर मेरी गहरी संवेदनाएं ।ईश्वर से प्रार्थना है कि वे दिवंगत आत्मा को शान्ति प्रदान करें एवं शोक संतप्त परिजनों को यह आघात सहने की शक्ति दे। @ChouhanShivraj
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) November 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">मध्य प्रदेश के मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान जी के ससुर श्री घनश्याम दास रामकिशन मसानी जी के दुःखद निधन पर मेरी गहरी संवेदनाएं ।ईश्वर से प्रार्थना है कि वे दिवंगत आत्मा को शान्ति प्रदान करें एवं शोक संतप्त परिजनों को यह आघात सहने की शक्ति दे। @ChouhanShivraj
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) November 18, 2020मध्य प्रदेश के मुख्यमंत्री श्री शिवराज सिंह चौहान जी के ससुर श्री घनश्याम दास रामकिशन मसानी जी के दुःखद निधन पर मेरी गहरी संवेदनाएं ।ईश्वर से प्रार्थना है कि वे दिवंगत आत्मा को शान्ति प्रदान करें एवं शोक संतप्त परिजनों को यह आघात सहने की शक्ति दे। @ChouhanShivraj
— Jyotiraditya M. Scindia (@JM_Scindia) November 18, 2020
-
मुख्यमंत्री श्री @ChouhanShivraj जी के ससुर श्री घनश्यामदास मसानी जी के निधन का दुःखद समाचार मिला।
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) November 19, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें एवं शोक संतप्त परिजनों को यह दुख सहन करने की शक्ति प्रदान करें। pic.twitter.com/cVI7XsXIPw
">मुख्यमंत्री श्री @ChouhanShivraj जी के ससुर श्री घनश्यामदास मसानी जी के निधन का दुःखद समाचार मिला।
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) November 19, 2020
ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें एवं शोक संतप्त परिजनों को यह दुख सहन करने की शक्ति प्रदान करें। pic.twitter.com/cVI7XsXIPwमुख्यमंत्री श्री @ChouhanShivraj जी के ससुर श्री घनश्यामदास मसानी जी के निधन का दुःखद समाचार मिला।
— Dr Narottam Mishra (@drnarottammisra) November 19, 2020
ईश्वर दिवंगत आत्मा को अपने श्रीचरणों में स्थान दें एवं शोक संतप्त परिजनों को यह दुख सहन करने की शक्ति प्रदान करें। pic.twitter.com/cVI7XsXIPw
महाराष्ट्रात होणार अंत्यसंस्कार..
घनश्यामदास मसानी यांचा जन्म १५ नोव्हेंबर १९३२ला महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यात झाला होता. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते. त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने भोपाळमध्ये निधन झाले. यानंतर त्यांचे पार्थिव आज गोंदियाला आणण्यात येणार आहे. गोंदियातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील.
एअर अॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून शिवराज सिंह चौहान, साधना सिंह चौहान आणि इतर कुटुंबीयांसोबत मसानी यांचे पार्थिव आज गोंदियात आणण्यात येईल. सकाळी ११ वाजेच्या सुमारास ते बिर्सी विमानतळावर येतील. तसेच, दुपारी तीनच्या सुमारास मसानी यांच्या गोंदियातील घरातून गोरेलाल चौक, मुख्य बाजारपेठ अशी त्यांची अंत्ययात्रा असणार आहे.
हेही वाचा : अजित पवारांच्या 'या' वक्तव्याचा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केला निषेध