ETV Bharat / bharat

मध्यप्रदेश : ८० वर्षीय आदिवासी महिलेच्या चित्रांचे इटलीत प्रदर्शन

या महिलेच्या पतीचे ४ दशकांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून मन गुंतविण्यासाठी आणि विरंगुळा म्हणून या महिलेने चित्रे काढण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडे शिक्षण नाही. मात्र, या घटनेमुळे त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल.

मध्यप्रदेश
author img

By

Published : Oct 5, 2019, 6:08 PM IST

उमारिया - मध्य प्रदेशातील उमारिया जिल्ह्यातील ८० वर्षीय आदिवासी महिलेने काढलेल्या चित्रांचे इटलीत प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या महिलेने स्वतःचे निम्मे आयुष्य ही चित्रे काढण्यात घालवले आहे. जोधाय्या बाई बैगा असे या महिलेचे नाव आहे. ती लोरहा या गावाची रहिवासी आहे. तिच्या चित्रांचे इटलीतील मिलान येथे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

या महिलेच्या पतीचे ४ दशकांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून मन गुंतविण्यासाठी आणि विरंगुळा म्हणून या महिलेने चित्रे काढण्यास सुरुवात केली. 'मी सर्व प्रकारचे प्राणी आणि माझ्या आजूबाजूला जे काही दिसेल, त्याची चित्रे काढते. मी भारतातील विविध भागांना खास तेथील चित्रे काढण्यासाठी भेटी दिल्या आहेत. सध्या मी फक्त चित्रेच काढण्यात वेळ घालवते. इतर कुठेही जात नाही. माझ्या पतीचे ४० वर्षांपूर्वी निधन झाले. तेव्हापासून मी चित्रकलेचा छंद जोपासला आहे. मला स्वतःच्या उपजिविकेसाठी आणि माझ्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी काहीतरी करणे आवश्यक होते,' असे या जोधाय्या बाईंनी म्हटले आहे. 'आता माझी चित्रे आंतरराष्ट्रीय व्यापीठावर पोहोचल्यामुळे खूप आनंद होत आहे,' असेही त्या म्हणाल्या.

80 year old tribal womans paintings
८० वर्षीय आदिवासी महिलेच्या चित्रांचे इटलीत प्रदर्शन

हेही वाचा - इस्रोकडून चंद्राच्या पृष्ठभागाची छायाचित्रे प्रसिद्ध

जोधाय्या बाई यांना त्यांचे शिक्षक आशिष स्वामी यांनी चित्रे काढण्यास शिकवले. 'जोधाय्या बाई यांनी त्यांच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्या चित्रांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होत आहे. सध्या त्यांच्या चित्रांचे इटलीत प्रदर्शन भरले आहे. मात्र, त्यांनी मिळवण्यासारखे अजूनही खूप काही आहे, असे मला वाटते,' असे स्वामी म्हणाले. 'हा क्षण आदिवासी समाजासाठी अभिमानाचा आहे. त्यांच्याकडे शिक्षण नाही. मात्र, या घटनेमुळे त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. त्यांच्यापैकी आणखीही काहीजण अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये पुढाकार घेतील. त्याचा आनंद घेतील,' असे ते म्हणाले.

हेही वाचा - काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात पोलीस आयुक्तालयावर ग्रेनेड हल्ला, १० जखमी

Intro:Body:

जोधाय्या बाई यांना त्यांचे शिक्षक आशिष स्वामी यांनी चित्रे काढण्यास शिकवले. 'जोधाय्या बाई यांनी त्यांच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यांच्या चित्रांचे आंतरराष्ट्रीय पातळीवर कौतुक होत आहे. सध्या त्यांच्या चित्रांचे इठलीत प्रदर्शन भरले आहे. मात्र, त्यांनी मिळवण्यासारखे अजूनही खूप काही आहे, असे मला वाटते,' असे स्वामी म्हणाले. 'हा क्षण आदिवासी समाजासाठी अभिमानाचा आहे. त्यांच्याकडे शिक्षण नाही. मात्र, या गटनेमुळे त्यांना नक्कीच प्रेरणा मिळेल. त्यांच्यापैकी आणखीही काहीजण अशा प्रकारच्या उपक्रमांमध्ये पुढाकार घेतील. त्याचा आनंद घेतील,' असे ते म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.