भोपाळ - लॉकडाऊनच्या आदेशाचे पालन न करता, मशीदीमध्ये नमाजासाठी जमलेल्या ४० लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे यांमध्ये गावच्या सरपंचाचाही समावेश आहे. मध्य प्रदेशच्या छिंदवाडामधील खैरीखुर्द गावात हा प्रकार समोर आला आहे.
गुरूवारी रात्री काही लोक मशीदीमध्ये नमाज पढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तपासणी केली असता, एकूण ४० लोक याठिकाणी एकत्र असल्याचे त्यांना दिसून आले. त्यानंतर लॉकडाऊनच्या आदेशाचा भंग केल्याबद्दल, तसेच राज्यात लागू असलेल्या जमावबंदीच्या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरिक्षक मुकेश द्विवेदी यांनी याबाबत माहिती दिली.
दरम्यान, मध्य प्रदेशमध्ये आतापर्यंत कोरोनाचे २५९ रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात १६ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हेही वाचा : कोरोना इफेक्ट : नागालँडमध्ये १०९ कैद्यांची मुक्तता..