नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषीच्या फाशीच्या डेथ वॉरंटवर आरोपी व त्यांच्या वकिलाच्या वेळ काढू धोरणामुळे न्यायालयाकडून दरवेळी नवीन तारीख मिळत आहे. त्यामुळे हे डेथ वॉरंट इश्यु होण्यात वेळ लागत आहे. यावर पीडितेच्या आईने नाराजी व्यक्त केली असून नवीन तारीख जरी मिळत असली तरीही अजून न्याय मिळण्याची आशा सोडली नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
पुढे बोलताना पीडितेची आई म्हणाली, की आरोपी आणि त्यांचे वकील प्रत्येक वेळी नवीन युक्ती लढवून फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यास आडकाठी आणत आहेत. न्यायालयाच्या प्रत्येक सुनावणीवेळी नवीन तारीख मिळत असल्याने आम्हाला न्याय मिळण्यास उशीर होत आहे. परंतु भारतीय न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास असून आम्हाला प्रत्येक वेळी न्यायाची नवीन आशा निर्माण होत आहे.