ETV Bharat / bharat

भारतात 5 हजारांपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त; 149 जणांचा मृत्यू - कोरोना बातमी

एकून 149 जणांचा मृत्यू झाला असून 32 जणांचा काल दिवसभरात मृत्यू झाला, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

लव अगरवाल
लव अगरवाल
author img

By

Published : Apr 8, 2020, 5:13 PM IST

नवी दिल्ली - भारतामध्ये आत्तापर्यंत 5 हजार 194 कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले आहेत. काल (मंगळवार) दिवसभरात 773 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तर 402 रुग्ण उपचारानंतर पूर्णत: बरे झाले आहेत. एकून 149 जणांचा मृत्यू झाला असून 32 जणांचा काल दिवसभरात मृत्यू झाला, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तसेच रुग्णांच्या उपचारासाठी एचसीक्यू म्हणजेच हाड्रोक्लोरोक्लीन या औषधांची भारतात कमतरता पडणार नाही, असे अगरवाल यांनी स्पष्ट केले. आतापर्यंत भारतात 1 लाख 21 हजार 271 जणांची कोरोना चाचणी घेतल्याचे आयसीएमआरचे तज्ज्ञ आर गंगाखेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

2 कोटी बांधकाम मजूरांना निधी वाटप

31 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात नोंदणीकृत बांधकाम मजूर आणि इतर मजूरांना आर्थिक मदत करण्यात आली आहे. 1 हजार ते 6 हजारांपर्यंतची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर 3 हजार कोटी 2 कोटी बांधकाम मजूरांना देण्यात आल्याचे गृह मंत्रालयाच्या सचिवांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.