ETV Bharat / bharat

कर्तारपूर कॉरिडॉर: गुरुनानक जयंती निमित्त ५०० हून अधिक भाविक पवित्र स्थळी होणार रवाना - गुरुनानक जयंती

पंतप्रधान मोदी आज (शनिवारी) कर्तारपूर कॉरडॉरमार्गे पाकिस्तानात जाणाऱ्या ५०० पेक्षा अधिक भाविकांच्या चमूला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त सर्व भाविक प्रथमच पाकिस्तानातील गुरुनानक यांच्या पवित्र स्थळी माथा टेकवण्यास जाणार आहेत.

कर्तारपूर कॉरिडॉर
author img

By

Published : Nov 9, 2019, 9:50 AM IST

चंदीगड - पंतप्रधान मोदी आज (शनिवारी) कर्तारपूर कॉरडॉरमार्गे पाकिस्तानात जाणाऱ्या ५०० पेक्षा अधिक भाविकांच्या चमूला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त सर्व भाविक प्रथमच पाकिस्तानातील गुरुनानक यांच्या पवित्र स्थळी माथा टेकवण्यास जाणार आहेत. यावेळी मोदी गुरुदासपूर जिल्ह्यातील कर्तारपूर कॉरिडॉरला जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या तपासणी चौकीचेही उद्घाटन करणार आहेत.

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातल्या नुरवाला जिल्ह्यापर्यंत कर्तारपूर कॉरिडॉर उभारण्यात आला आहे. भारतातील डेरा बाबा नानक ते पाकिस्तानातील गुरु नानक साहिब स्थळ या कॉरिडॉरने जोडण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये गुरुनानक यांचे पवित्र स्थळ साडेचार किमी आतमध्ये आहे. गुरुदासपूर येथील तपासणी चौकीच्या मंजूरी नंतरच भाविकांना पाकिस्तानात जाण्याची परवानगी मिळणार आहे. पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात उद्घाटनासाठी गुरुदासपूर येथे पोहचणार आहेत. २४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तानने दोन्ही देशांच्या 'झिरो पॉईंट' ठिकाणी करारावर सह्या केल्या होत्या. सर्व भाविक १० वाजता दरम्यान जाणार असल्याची माहिती मिळत आहे.कर्तारपूर कॉरिडॉने पाकिस्तानात जाणारे भाविक 'हाय प्रोफाईल'पहिल्या भाविकांच्या चमूमध्ये माजी पंतप्रधान मनमोहम सिंग, अकाल तख्तचे प्रमुख (जत्थेदार)हरप्रित सिंह, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, सुखबीर सिंह बादल, केंद्रिय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि नवज्योत सिंग सिद्धू सहभागी आहेत. शिरोमणी गुरद्वारा कमिटीचे सदस्य आणि पंजाब विधानसभेचे ११७ सदस्यही भाविकांच्या चमूमध्ये सहभागी आहेत.

Intro:Body:

कर्तारपूर कॉरिडॉर: गुरुनानक जयंती निमित्त ५०० भाविक आज पाकिस्तानात जाणार

चंदीगड - पंतप्रधान मोदी आज (शनिवारी) कर्तारपूर कॉरडॉरमार्गे पाकिस्तानात जाणाऱ्या ५०० पेक्षा अधिक भाविकांच्या गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. गुरुनानक यांच्या ५५० व्या जयंती निमित्त सर्व भाविक प्रथमच पाकिस्तानातील गुरुनानक यांच्या पवित्र स्थळी माथा टेकवण्यास जाणार आहेत. यावेळी मोदी गुरुदासपूर जिल्ह्यातील कर्तारपूर कॉरिडॉरला जाण्यासाठी उभारण्यात आलेल्या तपासणी चौकीचेही उद्घाटन करणार आहेत.

पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातल्या नुरवाला जिल्ह्यापर्यंत कर्तारपूर कॉरिडॉर उभारण्यात आला आहे. भारतातील डेरा बाबा नानक ते पाकिस्तानातील गुरु नानक साहिब स्थळ या कॉरिडॉरने जोडण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये गुरु नानक यांचे पवित्र स्थळ साडेचार किमी आतमध्ये आहे. गुरुदासपूर येथील तपासणी चौकीच्या मंजूरी नंतरच भाविकांना पाकिस्तानात जाण्याची परवानगी मिळणार आहे. पंतप्रधान मोदी थोड्याच वेळात उद्घाटनासाठी गुरुदासपूर येथे पोहचणार आहेत. २४ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तानने दोन्ही देशांच्या 'झिरो पॉईंट' ठिकाणी करारावर सह्या केल्या होत्या. सर्व भाविक १० वाजता दरम्यान जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

कर्तारपूर कॉरिडॉरवरून पाकिस्तानात जाणारे भाविक 'हाय प्रोफाईल'

पहिल्या भाविकांच्या चमूमध्ये माजी पंतप्रधान मनमोहम सिंग, अकाल तख्तचे प्रमुख (जत्थेदार)हरप्रित सिंह, पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह, माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल, सुखबीर सिंह बादल, केंद्रिय मंत्री हरसिमरत कौर बादल आणि नौज्योत सिंग सिद्धू सहभागी आहेत.  शिरोमणी गुरद्वारा कमिटीचे सदस्य आणि पंजाब विधानसभेचे ११७ सदस्यही भाविकांच्या चमूमध्ये सहभाग आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.