ETV Bharat / bharat

चंद्राच्या ध्रुवांवर आढळले गंजाचे नमुने; पृष्ठभागावर पाणी आणि ऑक्सिजन असल्याचे संकेत - Moon poles rusting

इस्रोच्या या चांद्रयानाने पाठवलेल्या छायाचित्रांमध्ये हे दिसून येत आहे, की चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवरील पृष्ठभाग गंजल्याप्रमाणे झाला आहे. चंद्राच्या जमीनीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असल्याची आपल्याला आधीपासून माहिती आहे. चंद्राच्या पृष्ठभागाला गंज चढत आहे म्हणजेच तेथे पाणी आणि ऑक्सिजनचे अंश असू शकतात असा दावा इस्रोने जारी केलेल्या माहितीपत्रकात करण्यात आला आहे...

Moon may be rusting along poles, suggest images sent by Chandrayaan-1
चंद्राच्या ध्रुवांवर आढळले गंजाचे नमुने; पृष्ठभागावर पाणी आणि ऑक्सिजन असल्याचे संकेत
author img

By

Published : Sep 7, 2020, 7:05 AM IST

नवी दिल्ली : देशाचे पहिले चांद्र अभियान, 'चांद्रयान-१'ने चंद्राची काही नवी छायाचित्रे पाठवली आहेत. चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवरील पृष्ठभाग गंजल्याचे या छायाचित्रांमधून दिसून येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री (अवकाश विभाग) जितेंद्र सिंह यांनी रविवारी याबाबत माहिती दिली.

इस्रोच्या या चांद्रयानाने पाठवलेल्या छायाचित्रांमध्ये हे दिसून येत आहे, की चंद्राच्या दोन्ही ध्रुवांवरील पृष्ठभाग गंजल्याप्रमाणे झाला आहे. चंद्राच्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असल्याची आपल्याला आधीपासून माहिती आहे. मात्र, चंद्राच्या पृष्ठभागावर पाणी आणि ऑक्सिजन असल्याचे यापूर्वी आढळून आले नाही. विशेष म्हणजे, पाणी आणि ऑक्सिजनशिवाय लोहाला गंज चढू शकत नाही. त्यामुळे छायाचित्रांमध्ये दिसून आलेला प्रकार हा आश्चर्यकारक असल्याचे सिंह म्हणाले.

  • Images sent by #ISRO mission Chandrayaan-1 indicate possible impact of Earth's atmosphere on the Moon. World's leading Space institution NASA takes note of this finding. pic.twitter.com/NkKKHAOuk0

    — Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) September 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चंद्रावरील गंजाला काही अंशी पृथ्वीचे वातावरण जबाबदार असल्याचे मत नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस रिसर्च अ‌ॅडमिनिस्ट्रेशन, म्हणजेच 'नासा'च्या वैद्यानिकांनी व्यक्त केले आहे.

दरम्यान, चंद्राच्या पृष्ठभागाला गंज चढत आहे म्हणजेच तेथे पाणी आणि ऑक्सिजनचे अंश असू शकतात असा दावा इस्रोने जारी केलेल्या माहितीपत्रकात करण्यात आला आहे.

हेही वाचा : नंदादेवीवरील संभाव्य किरणोत्सर्गाच्या भीतीतून एसआयएफच्या गुप्तचराने सीआयएला केली मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.