ETV Bharat / bharat

'जमातीतील सर्वांनी क्वारंटाईऩ व्हा,' निजामुद्दीन मरकझच्या प्रमुखाची ऑडियो क्लीप व्हायरल - मरकझ प्रमुख

निजामुद्दीन येथील मरकझचे प्रमुख मोहम्मद साद यांनी एक ऑडियो क्लीप जाहीर करून लोकांना आवाहन केले की, जमातमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी स्वतःला क्वारंटाईन करून घ्यावे.

nizamuddin community program
निजामुद्दीन मरकझच्या प्रमुखाची ऑडीयो क्लीप व्हायरल
author img

By

Published : Apr 2, 2020, 10:50 AM IST

नवी दिल्ली - निजामुद्दीन येथील मरकझचे प्रमुख मोहम्मद साद यांनी एक ऑडीयो क्लीप जाहीर करून लोकांना आवाहन केले की, जमातमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी स्वतःला क्वारंटाईन करून घ्यावे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वतःला क्वारंटाईन करून घेतल्याची माहितीही दिली आहे. सरकारला सहकार्य करण्याचे आवाहनदेखील साद यांनी लोकांना केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 28 मार्चला मरकझचे प्रकरण समोर आल्यापासून मोहम्मद साद बेपत्ता आहेत. पोलिसांनी 31 मार्चला याप्रकरणी सात जणांविरोधात तक्रार दाखल केली आहे. यामध्ये मोहम्मद साद यांना मुख्य दोषी ठरवण्यात आले आहे. बुधवारला पोलिसांची टीम मोहम्मद साद यांच्या घरी गेली होती. मात्र, त्याचा शोध लागला नाही. सध्या त्याचा शोध सुरू आहे.

गुरुवारी समोर आलेल्या ऑडीयोत मोहम्मद साद म्हणत आहेत की, हा कठीण काळ असून आपण सर्वांनी सरकारला सहकार्य करावे. जमातमध्ये सामील झालेल्या लोकांना येत्या 14 दिवसांसाठी स्वतःला क्वारंटाईन करण्याची विनंती केली आहे. मोहम्मद साद यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार स्वतःला क्वारंटाईऩ केल्याचा दावाही या ऑडीयोत केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.