चंदीगड - 'करतारपूर कॉरिडॉरमुळे आपल्यातील आणि गुरु नानक देव साहिब पवित्र धार्मिक स्थळातील अंतर संपलं आहे. असाहय्यपणे मागील ७० वर्षांपासून दुर्बीनीतून पवित्र स्थळाकडे पाहण्याची गरज नाही. ही संधी आपल्याला स्वांतत्र्याच्या ७० वर्षांनंतर मिळाली आहे, असे मोदी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी सिरसा येथे आले असता म्हणाले. यावेळी त्यांनी काश्मीर मुदद्यावरुन काँग्रेसवर जोरदार टीका केली.
हेही वाचा - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देशात जातीयवाद निर्माण करतोय- शर्मिष्ठा मुखर्जी
-
PM Modi, in Haryana's Sirsa: The distance and the obstacles between the holy place of our Guru Nanak Dev - Kartarpur Sahib and us, is now going to be eliminated. The helplessness to watch it through a pair of binoculars, for 70 yrs, is now being eliminated. #HaryanaAssemblyPolls pic.twitter.com/9NsjKFeLkP
— ANI (@ANI) October 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">PM Modi, in Haryana's Sirsa: The distance and the obstacles between the holy place of our Guru Nanak Dev - Kartarpur Sahib and us, is now going to be eliminated. The helplessness to watch it through a pair of binoculars, for 70 yrs, is now being eliminated. #HaryanaAssemblyPolls pic.twitter.com/9NsjKFeLkP
— ANI (@ANI) October 19, 2019PM Modi, in Haryana's Sirsa: The distance and the obstacles between the holy place of our Guru Nanak Dev - Kartarpur Sahib and us, is now going to be eliminated. The helplessness to watch it through a pair of binoculars, for 70 yrs, is now being eliminated. #HaryanaAssemblyPolls pic.twitter.com/9NsjKFeLkP
— ANI (@ANI) October 19, 2019
१९४७ साली भारत पाकिस्तान फाळणीला जनता जबाबदार आहे का? भाविकांना फक्त ४ किमी दूर असलेल्या पवित्र स्थळापासून लांब ठेवणं चुकीचे आहे. काँग्रेसने हे अंतर संपवण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होते. काँग्रेस आणि त्यांच्या सहयोगी पक्ष भारतीय संस्कृतीचा आदर करत नाहीत, अशी टीका त्यांनी यावेळी केली.
काश्मीर विषयी बोलतानी मोदी म्हणाले, काँग्रेसच्या काळात दिल्लीतील झोपलेल्या सरकारने काश्मीर प्रश्न अधिक गंभीर करून ठेवला होता. त्यामुळे काश्मिरचा काही भाग पाकिस्तानने आपल्याकडून हिसकावून घेतला. काश्मीरमधील एक-दोन कुटुंबांची काळजी घेतली तर संपूर्ण काश्मीरची काळजी घेतल्यासारखं आहे, असे काँग्रेसला वाटत होते. जम्मू काश्मीर आणि लद्दाखमधील लोकांशी कायम अन्याय होत आला आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा - INX Media case : पी. चिदंबरम, कार्ती, पीटर मुखर्जीवर सीबीआयचे आरोपपत्र
काश्मिरी पंडितांना काश्मीरमधून हाकलवून देण्यात आले. त्यांच्या मुलींवर अत्याचार झाले. काश्मीर सोडण्यास त्यांना भाग पाडण्यात आले, असे मोदी म्हणाले. हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आजपासून थांबणार आहे. २१ ऑक्टोबरला मतदान असून २४ ऑक्टोबरला हरियाणात कोणाची सत्ता येईल, हे स्पष्ट होईल.