ETV Bharat / bharat

'सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय' हीच आमची निती - नरेंद्र मोदी - varanasi

भाजपला राजकीयदृष्ट्या काही लोक अस्पृश्य समजतात. त्यांना भाजपचे लोक म्हटल्यावर नकोशे वाटतात. कारण भाजपचे लोक इमानदार असल्याने त्यांना आमची भीती वाटते. आमच्या सरकारने विरोधकांचाही सन्मान केला, असेही ते म्हणाले.

सर्वजन हिताय सर्वजन सुखाय हीच आमची निती - नरेंद्र मोदी
author img

By

Published : May 27, 2019, 1:37 PM IST

वारणसी - वाराणसीतील जनतेच्या आशीर्वादामुळेच मी पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान झालो आहे, असे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले. लोकसभा विजयानंतर ते पहिल्यांदाच त्यांचा मतदारसंघ असलेल्या वाराणसीत गेले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधीत केले.

वारणसीतील जनेतून मी उमेदवारी अर्ज भरला असला तरी प्रत्येक घरातून एक मोदी निवडणूक लढवत होता. ही निवडणूक न वाटता एखादा उत्सव वाटत होता. वाराणसीतील तरुणींनीही संपूर्ण काशीत फिरून प्रचार केला. मी अर्ज भरल्यानंतर एक महिना वारणसीत येऊ शकलो नाही. मात्र, मी निश्चिंत होतो. कारण मला वाराणसीतील जनतेवर पुर्ण विश्वास होता, असे ते यावेळी म्हणाले.

काही राजकीय पंडीत समजणाऱ्या व्यक्तींना या निवडणुकीचे अंदाज आले नाही. मुळात ते लोक विसाव्या शतकातच असून २१ व्या शतकातील नविन राजकारण त्यांच्या लक्षात आले नाही. गणितीय आकड्यांच्याही पुढे जाऊन एक सामजिक केमेस्ट्री असते. तिचा अंदाज केवळ सामान्य जनतेला येतो. त्यामुळे जनतेचा कौल राजकीय पंडितांना कळला नाही, असे ते म्हणाले.

काही लोकांनी ७० वर्षे आमचा उद्देश जनतेपर्यंत पोहचू दिला नाही. त्यामागे सत्ता टिकवून ठेवणे हा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, लोक हुशार झाले आहे. माध्यमेही आमच्या कार्यक्रमावर लक्ष ठवून होती. त्यामुळे तिसऱ्यांदा आम्हाला विजय मिळवता आला आहे. कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचे हे यश आहे. अनेक कार्यकर्त्यांनी यासाठी बलिदान दिले आहे. अनेकांच्या हत्या बंगाल, केरळ, जम्मू काश्मीर या राज्यात झाल्या.

भाजपला राजकीयदृष्ट्या काही लोक अस्पृश्य समजतात. त्यांना भाजपचे लोक म्हटल्यावर नकोशे वाटतात. कारण भाजपचे लोक इमानदार असल्याने त्यांना आमची भीती वाटते. आमच्या सरकारने विरोधकांचाही सन्मान केला. लोकशाही पध्दतीत विरोधक आवश्यक असतात. संसदेत चर्चा झाली पाहीजे. प्रत्येकाला त्याचे मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मात्र, मताच्या राजकारणामुळे ६० वर्षात महत्वाचे निर्णय टाळण्यात आले. आम्ही त्याचा विचार न करता निर्णय घेतले. सवर्णांना १० टक्के आरक्षण हा त्याचाच भाग आहे.

योजनांची अंमलबजावणी करताना जातीधर्म न पाहता प्रत्येकाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे, असे माझी भूमिका आहे. देशाची संपत्ती ही सर्व नागरिकांची मालमत्ता असते. ती स्वत:ची संपत्ती म्हणून जपली पाहिजे असे आवाहनही त्यांनी जनतेला केले. तासभर चाललेल्या त्यांच्या या भाषणादरम्यान कार्यकर्त्यांनी मोदींच्या नावाच्या घोषणा दिल्या. त्यामुळे त्यांना बोलताना अडथळा निर्माण होत होता.

Intro:Body:

Modi Live Speech

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.