नवी दिल्ली - निवडणुकीत मोठ-मोठ्या घोषणा करणाऱ्या लोकांचे आपण ट्रॅक रेकॉर्ड तपासून पाहा. त्यांचा टेप रेकॉर्ड ऐकू नका, असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी 'मैं भी चौकीदार' या प्रचार मोहिमेची आजपासून सुरुवात केली. त्यावेळी दिल्ली येथील तालकटोरा स्टेडिअममध्ये बोलताना मोदी यांनी विरोधी पक्षांना फैलावर घेतले.
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष आपली संपूर्ण शक्ती लावून प्रचार करत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी आज मैं भी चौकीदार या प्रचार मोहिमेचे रणशिंग फुंकले. यावेळी त्यांनी देशभरातील वेगवेगळ्या तब्बल ५०० ठिकाणांवरील कार्यकर्त्यांशी व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगच्या माध्यमातून संवाद साधला.
एकीकडे खोटे बोलण्याची फॅक्ट्री चालत आहे. रोज नव-नवे असत्य समोर येत आहेत. तुम्ही सत्य सांगण्याचे काम करा. त्यासाठी नरेंद्र मोदी हा अॅप डाऊनलोड करा. त्यामधून आपल्याला तथ्यपुरक माहिती मिळतील, असे आवाहन मोदी यांनी यावेळी जनतेला केले. यावेळी मैं भी चौकीदार या घोषणेणे सभागृह दणाणून उठले होते.
काही लोक देशाला आपली पैतृक संपत्ती समजतात. त्यामुळे एक चायवाला पंतप्रधान झाला हे त्यांना पचत नाही आहे, असे म्हणत मोदी यांनी विरोधी पक्षांवर टोला मारला. जे खोटे बोलतात त्यांची स्मृती तीक्ष्ण असणे गरजेचे आहे. ते या दिवशी एक माहिती देतात तर दुसऱ्या दिवशी विसरुन जातात. मात्र, माझी बुद्धीमत्ता तीक्ष्ण असल्यामुळे त्यांना आपण पकडून घेतो, असेही मोदी यावेळी म्हणाले.
आम्ही संविधानात संशोधन करून सामान्य वर्गातील गरीबांसाठी १० टक्के आरक्षण दिले आहे. विरोधी पक्ष म्हणतात की मिशन शक्ती गुपीत ठेवायला हवे होते. पण चीन, अमेरिका आणि रशियाने उघडपणे केले तर आम्ही मिशन शक्ती परिक्षण गुप्त का ठेवावे? असेही मोदी यावेळी म्हणाले.
मी देशामध्ये सामोर वाढत जाण्याचे वातावरण तयार केले आहे. आम्ही आपला वेळ भारत पाकिस्तान करण्यात व्यर्थ घालवला आहे. त्यांना सोडून द्या. आपल्याला पुढे वाढत राहायचे केवळ हेच लक्षात ठेवा, असेही मोदी यावेळी म्हणाले. पाकिस्तानला वाटत असेल मोदी निवडणुकांमध्ये व्यस्थ आहे तर काही करणार नाही. मात्र माझ्यासाठी निवडणूकांपेक्षा देशाची सुरक्षा महत्वाची आहे, असेही मोदी यावेळी म्हणाले.