ETV Bharat / bharat

एम. जे. अकबर मानहानी खटला दुसऱ्या न्यायालयात हलवण्याचे आदेश - former Union Minister MJ Akbar case

माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणीविरोधात दाखल केलेला मानहानीचा खटला आता दुसऱ्या कोर्टात हलवण्यात येणार आहे. सर्वेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केवळ आमदार आणि खासदाराच्या संबधित खटल्यांचीच सुनावणी 'राऊस व्हेन्यू' कोर्टात करण्यास परवानगी आहे. त्यामुळे एम. जे अकबर विरूद्ध पत्रकार प्रिया रमाणी हा खटला या कोर्टात चालवता येणार नाही, असं अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी विशाल पाहुजा यांनी स्पष्ट केलं

mj-akbars-defamation-case
एम. जे. आकबर
author img

By

Published : Oct 13, 2020, 4:25 PM IST

नवी दिल्ली - माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणीविरोधात दाखल केलेला मानहानीचा खटला आता दुसऱ्या कोर्टात हलवण्यात येणार आहे. सर्वेच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केवळ आमदार आणि खासदाराच्या संबधित खटल्यांचीच सुनावणी 'राऊस व्हेन्यू' कोर्टात करण्यास परवानगी आहे. त्यामुळे एम. जे. अकबर विरूद्ध पत्रकार प्रिया रमाणी हा खटला या कोर्टात चालवता येणार नाही, असं अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी विशाल पाहुजा यांनी स्पष्ट केलं. आता या खटल्याबाबत बुधवारी जिल्हा सत्र न्यायाधीश निर्णय घेणार आहेत.

सुमारे 20 वर्षांपूर्वी एम. जे. अकबर यांनी आपल्यासोबत गैरवर्तन केल्याचं रमाणी यांनी 'मीटू' चळवळीच्या पार्श्वभूमीवर म्हटले होते. त्यानंतर अकबर यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन, प्रिया यांच्याविरोधात बदनामीचा खटला दाखल केला होता. एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप करणार्‍या अनेक महिला पत्रकारांपैकी रमाणी या एक आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.