ETV Bharat / bharat

Chandrayaan-2 : इस्रोचे चांद्रयान-२ अवकाशात झेपावले; १४ दिवस राहणार पृथ्वीच्या कक्षेत

साऱ्या जगाचे लक्ष लागून राहिलेले भारताचे चांद्रयान-२ आज अवकाशात झेपावले. जवळपास २१ मिनिटानंतर चांद्रयानने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केला आहे.

चांद्रयान-२
author img

By

Published : Jul 22, 2019, 1:19 PM IST

Updated : Jul 22, 2019, 5:23 PM IST

नवी दिल्ली - अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेले भारताचे चांद्रयान-२ आज (सोमवार) अवकाशात झेपावले. दुपारी 2 वाजून 43 मिनिटांनी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-3 च्या मदतीने चांद्रयान-2 अवकाशात सोडण्यात आले. 54 दिवसांनी हे यान चंद्रावर पोहचणार आहे.

UPDATES :

  • चांद्रयान-२ मोहिमेवर कार्टूनिस्ट सब्बीर यांचे कार्टून प्रसिद्ध
    sabbir cartoon
    चांद्रयान-२ मोहिमेवर सब्बीर यांचे कार्टून
  • इस्रोचे प्रमुख के. सीवन म्हणाले, पुढील २४ तासात काम पूर्ण होणार आहे. चुका दुरुस्त करण्यात आल्या आहेत. चाचण्याही पूर्ण झाल्या आहेत. ज्यांचा या कार्यात सहभाग आहे, त्या सर्वांना माझा सलाम. इस्रोचे काम अद्यापही संपले नाही. यावर्षी इस्रो अनेक योजनांची आखणी करत आहे.
  • जीएसएलव्ही एमके-३-एम-१ ने पृथ्वीच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर इस्रोचे प्रमुख के सीवन यांच्यासह शास्त्रज्ञांनी केला जल्लोष
  • चांद्रयान-२ ने यशस्वीरित्या पृथ्वीच्या कक्षेत केला प्रवेश
  • दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी चांद्रयान-२ अवकाशात झेपावले.

लॉन्चिंगनंतर चांद्रयान पृथ्वीच्या कक्षेत पोहोचेल. यानंतर 14 दिवस पृथ्वीची परिक्रमा करणार आहे. परिक्रमा पूर्ण झाल्यावर चांद्रयान चंद्राच्या दिशेने जाईल. या दरम्यान, चांद्रयानाचा वेग अधिकाधिक १० किलोमीटर प्रति सेकंद आणि कमीत कमी ताशी ३ किलोमीटर असणार आहे.

भारताच्या या महत्वाकांक्षी मोहिमेकडे संपूर्ण देशाचेच नव्हे तर जगाचे लक्ष लागून राहिले होते. त्याला कारण म्हणजे भारताचे हे चांद्रयान 2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर म्हणजेच ज्या ठिकाणी सूर्याची किरणे पोहोचत नाहीत त्या भागामध्ये उतरणार आहे. विशेष म्हणजे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणारा म्हणजेच अलगद उतरणाऱ्या देशांमध्ये भारताचा चौथा नंबर लागणार आहे. चंद्रावरील दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरणार आहे. भारताच्या या कामगिरीनंतर आपण संपूर्ण जगाला मार्गदशक असणार आहोत.

चांद्रयान-2 ने एकूण 13 उपकरणे घेऊन उड्डाण केल. त्यातील 12 उपकरणे भारतीय आहेत तर नासाचे पॅसिव्ह एक्सपेरिमेंट हे 1 उपकरण असणार आहे. त्याचे वजन जवळपास आठ हत्तींच्या वजनाइतके म्हणजेच 3.8 टन इतके आहे. चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या या भागात पोहोचणारी कोणतीही मोहीम झालेली नाही. दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत पहिलाच देश असणार आहे.

चंद्राचा भूगर्भ आणि पृष्ठभाग कसा आहे, चंद्रावर कोणकोणते वायू आहेत, खनिजे कोणती आहेत, वातावरण कसे आहे, अशा प्रकारची माहिती रोव्हर गोळा करणार आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 22, 2019, 5:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.