ETV Bharat / bharat

हवाई दलाच्या बेपत्ता विमानाचे अवशेष सापडले, पायलट आशीष तंवर यांचा मृत्यू - aircraft

तंवर हे हरियाणातील पलवल येथील रहिवासी होते. ते त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक पुत्र होते. आशिष यांच्या पत्नी सुद्धा हवाई दलात रडार ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत.

पायलट आशीष तंवर यांचा मृत्यू
author img

By

Published : Jun 5, 2019, 10:13 AM IST

नवी दिल्ली - चीन सीमेजळील आसामच्या जोरहाट येथून सोमवारी (दि. ३ जून) अरूणाचलकडे उड्डाण केलेले हवाई दलाचे विमान क्षतिग्रस्त झाले होते. हे विमान शोधण्यात हवाई दलाला यश आले असून त्यातील २९ वर्षीय पायलट आशीष तंवर यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.

हवाई दलाच्या एएन-३२ या विमानाने सोमवारी १२ वाजून २५ मिनिटांनी आसामच्या जोरहाट विमानतळावरून उड्डाण केले होते. या विमानात ८ क्रू मेंबरसह ५ प्रवासी होते. उड्डाणानंतर ३५ मिनिटांत या विमानाचा रडारपासून संपर्क तुटला. त्यांनतर हे विमान कोसळल्याची माहिती मिळाली.

हे विमान शोधण्यासाठी हवाई दलाने सुखोई -३० आणि सी -१३० या विमानांची मोहिम सुरू केली होती. या विशेष शोध मोहीमेला काल या विमानाचे अवशेष शोधण्यात यश आले आहे. या विमानाचे पायलट आशिष तंवर यांना विरमरण आल्याचे हवाई दलाने जाहीर केले आहे. तंवर हे हरियाणातील पलवल येथील रहिवासी होते. ते त्यांच्या आईवडिलांचे एकुलते एक पुत्र होते. आशिष यांच्या पत्नी सुद्धा हवाई दलात रडार ऑपरेटर म्हणून कार्यरत आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.