ETV Bharat / bharat

कानपुरमध्ये सहा वर्षांच्या चिमुकलीची अंधश्रद्धेतून हत्या, अत्याचार केल्याचेही निष्पन्न - उत्तर प्रदेशच्या कानपुरमध्ये चिमुकलीची हत्या

उत्तर प्रदेशच्या कानपुरमधील भदरस या गावात एका सात वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करुन हत्या करण्यात आली आहे. आरोपींनी चिमुकलीवर सामुहिक अत्याचार करुन हत्या केली. इतकेच नाही तर चिमुकलीच्या शरीरातील काही अवयव देखील काढून घेतले आहेत.

Minor girl raped and killed on superstition belief
उत्तर प्रदेशच्या कानपुरमध्ये चिमुकलीची हत्या
author img

By

Published : Nov 17, 2020, 9:56 AM IST

Updated : Nov 17, 2020, 1:30 PM IST

कानपूर (उत्तर प्रदेश) - उत्तर प्रदेशच्या कानपुरमधील भदरस या गावात एका सात वर्षांच्या चिमुकलीची अत्याचार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दिवाळीच्या दिवशी रात्री ही घटना घडली. अंधश्रद्धेतून हत्या केल्याचे समोर आले आहे. तर आरोपींनी चिमुकलीवर सामुहिक बलात्कार करुन गळा चिरुन तिची हत्या केली. इतकेच नाही तर चिुकलीच्या शरीरातील काही अवयव देखील काढून घेतले आहेत.

चिमुकली अंधश्रद्धेचा बळी
15 नोव्हेंबरला काली मंदिराजवळ चिमुकलीचा मृतदेह आढळला. त्यामुळे गावात खळबळ उडाली. 21 वर्षांपासून संतती प्राप्त होत नसल्याने परशुराम आणि सुनैना या दाम्पत्याने अंधश्रद्धेला बळी पडून हे कृत्य केल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. निसंतान परशुराम याने अंधश्रद्धेला बळी पडून चिमुकलीची हत्या करण्यास सांगितले होते. त्याने तंत्र-मंत्राच्या पुस्तकात बालिकेचे यकृत आणि हृदय खाल्ल्याने संतती प्राप्त होते असे वाचले होते. चिमुकलीची हत्या करण्यासाठी त्याने त्याचा पुतण्या अंकुल आणि त्याचा मित्र वीरन यांना 1500 रुपये दिले होते. दोन्ही आरोपींनी हत्येपूर्वी मद्यप्राशन केले. त्यांनी चिमुकलीवर शारिरीक अत्याचार करुन हत्या केली. त्यानंतर हृदय आणि यकृत काढून घेतले.

उत्तर प्रदेशच्या कानपुरमध्ये चिमुकलीची हत्या

अवयवही घेतले काढून

दिवाळीच्या दिवशी संध्याकाळी शेजारी राहणाऱ्या अंकुल या आरोपीने फटाका आणण्याच्या बहाण्याने मुलीला घराबाहेर नेले. त्यांनी प्रथम जंगलात तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर मुलीच्या शरीरातून सर्व अवयव बाहेर काढून जोडप्याला दिले. तर दाम्पत्याने अंधश्रद्धांवर विश्वास ठेवून चिमुकलीचे यकृत खाऊन इतर अवयवांची विल्हेवाट लावली, अशी माहिती एसपी बृजेश श्रीवास्तव यांनी दिली.

आरोपींना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अंकुल आणि वीरन यांना त्याचे काका परशुराम यांनी एका चिमुकलीचे हृदय, यकृत आणि इतर काही अवयव आणण्यास सांगितले होते. परशुराम आणि त्याच्या पत्नीने यकृत खाऊन इतर अवयव कुत्र्याला खाऊ घातले. पोलिसांनी आरोपींकडून हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केला आहे. त्यानंतर अंकुल, वीरन आणि आरोपी दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.

मृत चिमुकलीच्या घराजवळ राहणारे परशुराम यांचा 1999 मध्ये विवाह झाला होता. मात्र 21 वर्षांपासून त्यांना अपत्य नव्हते. ज्यामुळे त्यांनी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन पुतण्या अंकुल आणि वीरन यांनी पैसे देऊन चिमुकलीचे हृदय आणि यकृत आणायला सांगितले. दोन्ही आरोपींना चौकशीसाठी बोलावल्यानंतर हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. त्यानंतर दोघांसह दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे.

Last Updated : Nov 17, 2020, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.