नवी दिल्ली - सेक्स सीडीप्रकरणामध्ये अडकलेला वादग्रस्त स्वयंघोषित धर्मगुरू नित्यानंदचे पासपोर्ट रद्द केल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. स्वामी नित्यानंद हा 10 वर्षांपूर्वी भारतामधून फरार झाला होता.
नित्यानंदने इक्वोडोर देशाजवळ एक बेट खरेदी केले आहे. त्याने त्या बेटाला कैलास असे नाव दिले आहे. त्या बेटाला त्याने सर्वोत्कृष्ट हिंदूराष्ट्र अस्लयाचे म्हटले आहे. त्यामुळे तो पुन्हा चर्चेमध्ये आला असून परराष्ट्र मंत्रालयाने स्वामी नित्यानंद हा अपराधी असल्याची माहिती भारतीय दुतावास आणि इक्वोडोर सरकारला दिली आहे.
स्वामी नित्यानंदचे खरे नाव राजशेखरन असे आहे. 2010 ला दोन मुलींनी त्याच्यावर अपहरण करून बलात्कार केल्याचा आरोप केला होता. त्याप्रकरणी जामीन मंजूर झाल्यानंतर तो भारतामधून फरार झाला.