ग्वाल्हेर - मध्यप्रदेशमधील पोटनिवडणुकीत भाजप व काँग्रेस या दोन्ही पक्षाने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. त्या दरम्यानच दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक रंगली आहे. परंतू ही चकमक होत असताना नेत्यांची जीभ घसरत चालल्याचे प्रकार समोर येऊ लागले आहेत. नेते आता कोणताही विचार न करता एकमेकांवर मर्यादा सोडून टीका करण्यात मश्गुल झाले आहेत. यातच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते कमलनाथ यांनी मंत्री इमरती देवीवर आक्षेपार्ह टीपण्णी केली. यावरुन येथील राजकीय वातावरण तापले आहे. कमलनाथ यांच्या आक्षेपार्ह टीकेनंतर डबरा विधानसभेच्या भाजप उमेदवार आणि मंत्री इमरती देवीने ईटीवी भारतसोबत खास वार्तालाप करताना म्हटले, की कमलनाथ काँग्रेसचा सत्यानाश करत आहेत.
'कमलनाथ बजरंगबलीचे सच्चे भक्त नाहीत'
मंत्री इमरती देवीने ईटीवी भारतसोबत खास वार्तालाप करताना म्हटले, की काँग्रेस पार्टी आणि कमलनाथ यांना दलित आणि गरीब लोकांची इज्जत करता येत नाही. ते दलित लोकांना कमी समजतात. कमलनाथ ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेली मी त्यांच्या ऑफिसला जात असे, त्यावेळी ते तेथे उभे राहत होते. मी कधीच त्यांच्यासमोर खुर्चीवर बसले नाही. तसेच बजरंग बलीचे स्वत:ला भक्त समझतात परंतु ते खरे भक्त नाहीत असा आरोप मंत्री इमरती देवीने कमलनाथ यांच्यावर केला.
काँग्रेसने कमलनाथ यांनी काढले नाही तर पक्षाचा सत्यानाश
त्या पुढे म्हणाल्या की, कमलनाथ यांनी ज्या पद्धतीने माझ्यावर टीका केली आहे, त्यावरुन असे वाटते की त्यांच्या घरात आई-बहिण नाही. तसेच ते घरात आपल्या आई-बहिणीसोबत असेच बोलत असतील का? त्यांनी केलेल्या टीके नंतर माझ्या पक्षाने त्यांच्यावर गुन्हा दाखल नाही केला तर मी आंदोलन करणार आहे. कमलनाथ हे काँग्रेस पक्षाचा सत्यानाश करत आहेत. यामुळ काँग्रेसने त्यांना काढून टाकावे.
८० हजारच्या मताधिक्क्याने विजयी होणार
त्या पुढे म्हणाल्या, की पोटनिवडणुकीची तयारी जनतेमध्ये दिसत आहे. डबरा विधानसभेमधील जनता मागील वर्षापासून तयारी करत आहे. येथील जनतेवर माझा पूर्ण विश्वास असून ही जनताच मला विजयी करणार आहे. मागील वेळी येथील नागरिकांनी मला 62 हजार मतांनी विजयी केले होते. यावेळी मी ८० हजारच्या मताधिक्क्याने विजयी होणार आहे.