हैदराबाद : लॉकडाऊनमुळे तेलंगाणामध्ये अडकलेल्या सहा हजार मजुरांना आपल्या घरी ओडिशामध्ये पोहोचवण्यासाठी तेलंगाणा सरकारने पाऊल उचलले आहे. करीमनगर आणि निझामाबाद जिल्हा प्रशासन यासाठी तीन विशेष श्रमिक रेल्वे सोडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व मजुरांचे आधी रेल्वे स्थानकांवर स्क्रीनिंग केले जाणार आहे. त्यानंतरच त्यांना रेल्वेमध्ये चढण्याची परवानगी मिळणार आहे. यासोबतच, या मजुरांना राहत्या ठिकाणाहून रेल्वे स्थानकापर्यंत आणण्यासाठी १७० सॅनिटाईझ्ड बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. या मजूरांची माहिती, आणि ट्रॅव्हल हिस्ट्री घेतली जाणार आहे. तसेच, त्यांचे स्क्रीनिंग आणि आरोग्य तपासणी झाल्यानंतर त्यांना अन्न पुरवले जाणार आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हाधिकारी श्यामप्रसाद लाल यांनी दिली.
यावेळी ज्या मजूरांना कोरोनाची लक्षणे दिसून येतील, त्यांना तातडीने विलगीकरण कक्षांमध्ये हलवण्यात येणार आहे असेही लाल यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : वंदे भारत मिशन : श्रीलंकेत अडकलेले 685 भारतीय मायदेशी दाखल