ETV Bharat / bharat

सायकलवर घरी निघालेल्या कामगाराचा मृ्त्यू; उत्तर प्रदेशच्या शहाजहानपूरमधील घटना - मुख्य आरोग्य अधिकारी

देशात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. या दरम्यान देशाच्या अनेक भागात विविध राज्यांतील कामगार अडकून पडले आहेत. लॉकडाऊनला कंटाळून अनेक कामगारांनी पायी आणि सायकलवर घरचा रस्ता धरला आहे. अशाच एका कामगाराचा उत्तर प्रदेशातील शहाजहानपुरमध्ये मृत्यू झाला.

Death of a worker
कामगाराचा मृ्त्यू
author img

By

Published : May 2, 2020, 2:03 PM IST

लखनौ - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात तिसऱ्या टप्प्यात लॉकडाऊन सुरू करण्यात आला आहे. या दरम्यान देशाच्या अनेक भागात विविध राज्यांतील कामगार अडकून पडले आहेत. लॉकडाऊनला कंटाळून अनेक कामगारांनी पायी आणि सायकलवर घरचा रस्ता धरला आहे. अशाच एका कामगाराचा उत्तर प्रदेशातील शहाजहानपूरमध्ये मृत्यू झाला.

धरमवीर असे या ३२ वर्षीय कामगाराचे नाव असून तो दिल्लीहून बिहारला त्याच्या घरी सायकलवर निघाला होता. त्याने २८ एप्रिलला सायकल प्रवास सुरू केला होता. शुक्रवारी रात्री त्याने आणि त्याच्या सहकाऱयांनी दिल्ली-लखनऊ महामार्गावरील शहाजहानपुरमध्ये मुक्काम केला. तिथे अचानक धरमवीरची प्रकृती बिघडल्याने सहकाऱयांनी त्याला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

मृत धरमवीरची कोरोना चाचणी करण्यासाठी वैद्यकीय नमुने घेण्यात आले आहेत. त्याच्या सहकाऱ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले असून त्यांचेही नमुने तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. राजीव गुप्ता यांनी ही माहिती दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.