ETV Bharat / bharat

'इतर राज्यात पुन्हा जाण्याची इच्छा नाही'; बिहारमध्ये परतलेल्या कामगारांची भावना

author img

By

Published : May 17, 2020, 5:54 PM IST

मुंबईतून परतलेल्या रामपाल यादव यांनी आपबिती सांगितली. वाईट दिवस आल्यानंतर आमची किंमत कमी झाली. कॉन्ट्रक्टर आणि मालकाने लॉकडाऊनमुळे पगार देण्यास नकार दिला आणि याला विरोध केला म्हणून आम्हाला इमारतीतून धक्के मारत बाहेर हाकलण्यात आले, असे रामपाल यांनी सांगितले.

'इतर राज्यात पुन्हा जाण्याची इच्छा नाही'; बिहारमध्ये परतलेल्या कामगारांची भावना

पाटणा - लॉकडाऊनमुळे परराज्यात अडकलेल्या कामगारांसाठी विशेष श्रमिक ट्रेनची व्यवस्था करण्यात आली आहे. बिहारमध्येही इतर राज्यातून अनेक कामगार परतले आहेत. ९ रेल्वेंच्या माध्यमातून जवळपास १० हजार लोक बिहारमध्ये परतले आहेत. मुंबईतून परतलेल्या रामपाल यादव यांनी आपबिती सांगितली. वाईट दिवस आल्यानंतर आमची किंमत कमी झाली. कॉन्ट्रक्टर आणि मालकाने लॉकडाऊनमुळे पगार देण्यास नकार दिला आणि याला विरोध केला म्हणून आम्हाला इमारतीतून धक्के मारत बाहेर हाकलण्यात आले, असे रामपाल यांनी सांगितले.

वास्तविक, दुसऱ्या राज्यांतून बिहारमध्ये आलेले कामगार परत दुसऱ्या राज्यात जाण्यास तयार नाहीत. कामधंदा बंद झाल्याने बचतीचे पैसेही गेले, असे अजमेरहून आपल्या पती आणि तीन वर्षीय मुलासह परतलेल्या उषा देवी सांगत होत्या. सरकार आपल्याला कठीण काळात मदत करेल, असे वाटत होते. मात्र, एकाच व्यक्तिला पुरेसे अन्न तीन जणांसाठी दिले जात होते, असेही उषा यांनी सांगितले.

दिल्लीहून परतलेल्या सुरेंद्र साह यांनी सांगितले की, जेवणाची खूप अडचण निर्माण झाली होती. जेव्हा देशभरात लोक दिवे लावत होते तेव्हा दिल्लीत फसलेले बिहारी लोक अन्नासाठी तडफडत होते. आम्ही मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या कार्यालयातही गेलो मात्र आम्हाला तिथून हाकलण्यात आले, असे साह यांनी सांगितले.

दरम्यान, आपल्या घरी परतलेले कामगार पुन्हा कामासाठी इतर राज्यात जाण्यास तयार नाहीत. प्रत्येक राज्यातील कामगार आपल्या घरी पोहोचत आहेत. आता गावाकडेच थोडे पैसै कमवून आनंदाने राहायचे, असा निर्धारच या कामगारांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.