ETV Bharat / bharat

आयआयटी दिल्लीकडून कोरोनाबाधितांचा शोध घेणाऱ्या किटचे संशोधन, मायक्रोसॉफ्ट इंडियाकडून आर्थिक मदत - lock down latest news

कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. सध्या कोरोनाबाधित व्यक्तीची ओळख हीच एकमेव बाब करण्यापासून दूर ठेवणारी आहे. हे लक्षात घेऊन आयआयटी दिल्ली कोविड-19 चे संक्रमण शोधून काढणारे यंत्र बनवत आहे. यासाठी त्यांना मायक्रोसोफ्ट इंडियाकडून आर्थिक मदत मिळणार आहे.

आयआयटी दिल्ली न्यूज
आयआयटी दिल्ली न्यूज
author img

By

Published : May 29, 2020, 2:36 PM IST

नवी दिल्ली - कोरोना विषाणूला रोखण्यासाठी अद्याप कोणतेही औषध किंवा लस सापडलेली नाही. यामुळे कोरोना संसर्गाची प्रकरणे वाढत आहेत. सध्या कोरोनाबाधित व्यक्तीची ओळख हीच एकमेव बाब करण्यापासून दूर ठेवणारी आहे. हे लक्षात घेऊन आयआयटी दिल्ली कोविड-19 चे संक्रमण शोधून काढणारे यंत्र बनवत आहे. यासाठी त्यांना मायक्रोसॉफ्ट इंडियाकडून आर्थिक मदत मिळणार आहे.

सध्या आयआयटी दिल्लीकडून अशा प्रकारच्या दोन प्रकल्पांवर कार्य सुरू आहे. या अंतर्गत कुसुम स्कूल ऑफ बायलॉजिकल सायन्सेस येथील शास्त्रज्ञांनी एक तंत्रज्ञान विकसित केले आहे. याच्याद्वारे कमी किमतीत चांगले टेस्टिंग रिझल्ट मिळतील. याला आयसीएमआरची मान्यताही मिळाली आहे. अशाच प्रकारचा आणखी एक प्रकल्प आयआयटी दिल्ली नॅशनल केमिकल लॅबोरेटरी पुणेसह देखील करत आहे. यामध्ये डायग्नोस्टिक्स सेरॉलॉजिकल किट बनवले जात आहे.

या दोन्ही प्रकल्पांना अर्थबळ पुरवण्यासाठी मायक्रोसोफ्ट इंडिया पुढे आली आहे. कंपनीच्या राष्ट्रीय तांत्रिक अधिकारी रोहिणी श्रीवास्तव यांनी ही माहिती दिली. या मदतीसाठी आयआयटी दिल्लीचे संचालक प्राध्यापक व्ही. रामगोपाल राव यांनी मायक्रोसॉफ्ट इंडियाचे आभार मानले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.