ETV Bharat / bharat

'भगव्या जर्सीवरुन मी तर फक्त गंमत केली,' मेहबूबा मुफ्तींनी मारली पलटी

मुफ्ती यांनी 'भगव्या रंगाच्या जर्सीमुळेच टीम इंडियाला इंग्लंडविरोधातल्या सामान्यात हार पत्करावी लागली,' असे ट्विट केले होते. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागल्यानंतर 'मी फक्त गंमत केली' म्हणत त्यांनी पलटी मारली आहे.

मेहबूबा मुफ्ती
author img

By

Published : Jul 1, 2019, 9:33 PM IST

नवी दिल्ली - टीम इंडियाच्या भगव्या रंगाच्या जर्सीवरुन मागील काही दिवसांपासून जोरदार राजकारण सुरू आहे. विश्वकरंडकात ब्रिटनकडून एका सामन्यात भारताचा पराभव झाल्यानंतर पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनीही या वादात उडी घेतली होती. त्यांनी 'भगव्या रंगाच्या जर्सीमुळेच टीम इंडियाला रविवारच्या इंग्लंडविरोधातल्या सामान्यात हार पत्करावी लागली,' असे ट्विट केले होते. मात्र, या टि्वटचा सोशल मीडियावर जोरदार समाचार घेण्यात आल्यानंतर त्यांनी 'मी फक्त गंमत केली,' असे म्हणत पलटी मारली आहे.

मेहबूबा यांनी स्वतःच्या ट्विटचा बचाव करताना भाजप कार्यकर्त्याच्या वादग्रस्त ट्विटचे उदाहरण दिले आहे. एका भाजप नेत्याकडून हिंदुंना मुस्लिम महिलांवर सामूहिक बलात्कार करण्याचे आवाहन ट्विटद्वारे केले जाते. पण या टि्वटपेक्षा मी भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल गमतीने केलेल्या टि्वटची जास्त चर्चा होते. अशी धक्कादायक विधाने जाणीवपूर्व दाबली जातात का? एका साध्या टि्वटवर इतक्या कठोर प्रतिक्रिया येतात पण भाजप नेत्याच्या टि्वटवर संताप का व्यक्त होत नाही? असा सवाल मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे.

  • My tweet about India’s performance (all in good humour) got more traction than a BJP leader asking Hindus to gangrape Muslim women. Are such appalling statements intentionally being brushed under the rug? An innocuous tweet evokes strong reactions but why no outrage against this https://t.co/lYrjAjPCb9

    — Mehbooba Mufti (@MehboobaMufti) July 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'मला अंधश्रद्धाळू म्हटले तरी हरकत नाही. मात्र, भगव्या रंगाच्या जर्सीमुळेच टीम इंडियाला रविवारच्या इंग्लंडविरोधातल्या सामान्यात हार पत्करावी लागली,' असे ट्विट मुफ्ती यांनी केले होते. यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागल्यानंतर 'मी फक्त गंमत केली' म्हणत त्यांनी पलटी मारली आहे. त्यांच्या ट्विटनंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मेहबूबा यांना मनोरुग्णालयात पाठवण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या इतर नेत्यांनीही मेहबूबा यांच्यावर टीका केली होती.

Intro:Body:

डेव्हिड वार्नरचा आणखी एक विक्रम; तिसऱ्यांदा बनला 'बाप'

लंडन - ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेव्हिड वार्नर तिसऱ्यादा बाप बनला आहे. डेव्हिड वार्नरची पत्नी कँडीस हिने इंग्लंडमधील एका खासगी रुग्णालयात गोंडस मुलीलाल जन्म दिला. ही माहिती वार्नर आणि कँडीस यांनी  आपल्या इंन्टाग्रामच्या अकाऊंटवर फोटो पोस्ट करुन दिली आहे.

डेव्हिड वार्नरने इंन्टाग्रामवर आपल्या तिन्ही मुली आणि पत्नी कँडिंस हिचा एकत्रित काढलेला फोटो पोस्ट केला आहे. तसेच त्याने काल रविवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास एक नविन पाहुण्याचे माझ्या घरी आगमन झाले असल्याचे सांगितले. पत्नी कँडीसही ठिक असून नन्ह्या परीचे नाव ईस्ला रोज वार्नर ठेवण्यात येणार असल्याचे समजते.

इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेमध्ये सर्वात जास्त धावा डेव्हिड वार्नरने बनवल्या आहेत. वार्नरला चेंडूशी छेडछाड केल्याप्रकरणी १ वर्षाची बंदी घालण्यात आली होती. तेव्हा वार्नवर प्रचंड प्रमाणात टीका करण्यात आली. मात्र, त्याने क्रिकेटप्रती असलेले प्रेम बंदीनंतर संघात परतून दाखवला. पुनर्गामन कर त्याने खोऱ्याने धावा जमवल्या. त्याची धावाची भूक शमलेली नाही. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या विश्वकरंडक स्पर्धेतील ८ सामन्यात ५१६ धावा डेव्हिड वार्नरने बनवल्या आहेत.    

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.