नवी दिल्ली - बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी रविवारी नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा दर्शवणाऱ्या आणि राहुल गांधीच्या सावरकरांवरील वक्तव्याला विरोध करणाऱ्या शिवसेनेला सोबत घेतल्याबद्दल काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. मायावतींनी ट्विटच्या माध्यामातून काँग्रेसकडे आपली भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
शिवसेना अजूनही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाला त्यांनी केंद्रात पाठिंबा दर्शवला. मात्र, महाराष्ट्रात अजूनही काँग्रेस शिवसेनेसोबत आहे. हा काँग्रेसचा दुटप्पीपणा नाही का, असा सवालही मायावतींनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा - भिन्न विचाराचे पक्ष एकत्र आले आहेत, हळूहळू गैरसमज दूर होतील - जयंत पाटील
काँग्रेसने या विषयी आपली भूमिका स्पष्ट करावी. अन्यथा, पक्षाच्या कमकुवतपणावरून लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी हे केवळ एक नाटक होते असेच समजले जाईल, असेही मायावतींनी म्हटले आहे.