ETV Bharat / state

...म्हणून, प्रयागला त्रिवेणी संगमावर तर, नाशिकला रामकुंड इथं भविकांची स्नानासाठी गर्दी - MAUNI AMAVASYA

मौनी अमवस्या निमित्त गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. कुंभमेळ्यात मौनी अमावस्येला होणाऱ्या अमृत स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे.

MAUNI AMAVASYA
मौनी अमवस्यानिमित्त गोदावरी नदीत स्नान करताना भाविक (Etv Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 29, 2025, 5:21 PM IST

Updated : Jan 29, 2025, 8:27 PM IST

नाशिक : मौनी अमावस्या निमित्त नाशिकच्या गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. धर्मग्रंथ आणि शास्त्रांमध्ये या अमावस्येचं खास महत्त्व सांगितलं आहे. अशीही मान्यता आहे की, मौनी अमावस्या निमित्तानं व्रत केल्यानं पितरांची संतुष्टी होते. तसंच घरात सुख, समृद्धी आणि संततीची वृद्धी होते. त्यामुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात पिंडदान आणि पवित्र स्नान करण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. कुंभमेळ्यात मौनी अमावस्येला होणाऱ्या अमृत स्नानाला विशेष धार्मिक महत्त्व आहे. या अमृत स्नानासाठी प्रयागमध्ये गंगा स्नान करण्यासाठी लाखो लोक जमले होते. यावेळी अमृतस्नानासाठी त्रिवेणी योग तयार होत असल्यानं देशभरातून करोडो लोक एकत्रित आले आहेत.

144 वर्षांनी त्रिवेणी योग : हिंदू प्रथांनुसार 144 वर्षांनंतर त्रिवेणी योग आला आहे. अशात मौनी अमावस्यानिमित्त कुंभ नगरी असलेल्या नाशिकमध्ये देखील गोदावरी नदीत पवित्र स्नान करण्यासाठी देशभरातून हजारो भाविक दाखल झाले आहेत. सकाळपासून भाविकांनी या ठिकाणी स्नानासाठी गर्दी केली असून या भागामध्ये कुठलाही अनुचित प्रकार होवू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतिनिधी (ईटीव्ही भारत प्रतिनिधी)

मौनी अमावस्या दानधर्म करण्याचे विशेष महत्व : मौनी अमावस्या निमित्त दानधर्म करण्याचं विशेष महत्व सांगितलं आहे. माघ महिन्यात तीळ, लोकरीचे कपडे आणि तूप दान करणे खूप पुण्यदायी मानले जाते. म्हणूनच मौनी अमावस्येला या वस्तूंचे दान जरूर करावे. तुम्ही तुमच्या श्रद्धा आणि क्षमतेनुसार थोडं दानही तुम्ही करू शकता. यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्ष प्राप्ती होते, अशी धारणा आहे. मौनी अमावस्येच्या दिवशी मानवांना पृथ्वीवर आणणारे पहिले मनुष्य मनु ऋषींचा जन्म झाला होता. मनु ऋषींच्या नावावरूनच या व्रताला मौनी अमावस्या हे नाव पडलं आहे असं नाशिक पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी म्हटलं आहे.

म्हणून आम्ही स्नान केले : आज मौनी अमावस्या आहे. या दिवशी गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे. आम्ही मुंबईहून नाशिकला गोदावरी नदीत स्नान करण्यासाठी सहकुटुंब आलो. तसंच आम्ही आमच्या पूर्वजांचं पिंडदान रामकुंड घाटावर केलं. याचं आम्हाला आत्मिक समाधान असल्याचं प्रीती शर्मा या भाविकेनं सांगितलं.

हेही वाचा :

  1. पुण्याहून महाकुंभ मेळाव्याला जाताना कारचा मध्य प्रदेशात अपघात, तिघांचा मृत्यू
  2. नाशिक कुंभमेळा भूसंपादन विरोधात स्थानिक आक्रमक; म्हणाले आधीच्या भूसंपादनाचे पैसे दिले नाहीत मग...
  3. महाकुंभ 2025 : 400 टन कचऱ्यापासून मंदिराची रचना; संगम स्नानासह 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन, बोट चालवून भारताला घाला प्रदक्षिणा

Last Updated : Jan 29, 2025, 8:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.