ETV Bharat / bharat

हुतात्मा जवानाच्या पत्नीने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत - छत्तीसगढ

छत्तीसगढ येथील बस्तरमध्ये हुतात्मा जवानाच्या पत्नीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 10 हजार रुपयांची मदत केली आहे.

wife o f Martyr jawan donated money in Corona Fund

author img

By

Published : Apr 30, 2020, 9:30 AM IST

नवी दिल्ली - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरातून विविध स्वरूपात मदत करण्यात येत असून आहे. छत्तीसगढ येथील बस्तरमध्ये हुतात्मा जवानाच्या पत्नीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 10 हजार रुपयांची मदत केली आहे.

राधिका साहू असे त्यांचे नाव आहे. नक्षलवादी हल्ल्यात राधिकाचे पती उपेंद्र साहू हुतात्मा झाले होते. कोरोना विषाणूंविरूद्ध लढण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस 10 हजार रुपये दिले आहेत. 14 मार्च रोजी बस्तर जिल्ह्यातील बोदली भागात माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात राधिकाचे पती हुतात्मा झाले होते.

हुतात्मा जवानाच्या पत्नीने केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत

'पती हुतात्मा झाल्यानंतर सरकारकडून भरपाई म्हणून मिळालेल्या पैशाचा काही भाग मी मदत म्हणून दिला. माझे पती नेहमीच त्यांच्या कठीण परिस्थितीतही लोकांची मदत करायचे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात अडचणींना सामना करावा लागणाऱ्या गरीब लोकांसाठी मी ही मदत केली. ही माझ्या पतीला खरी श्रद्धांजली असेल', असे राधिका म्हणाल्या. दरम्यान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून राधिकाच्या उदारतेला सलाम केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.