उदयपूर - जिल्ह्यातील गिंगला भागात लव्ह जिहादचे प्रकरण समोर आले आहे. गिंगला भागातील एका युवकाने विवाहित महिलेला फूस लावून पळवून नेले होते. त्यानंतर युवक त्या महिलेवर धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव टाकत होता.
या सर्व घटनेनंतर ती महिला घरी आली. घडलेल्या प्रकाराबाबत उदयपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
दरम्यान, पीडित महिला ही गिंगला परिसरातच राहते. तिचा पती हा अहमदाबादमध्ये एका मिठाईच्या दुकानात कामाला आहे. फोनवरून या महिलेची आणि युवकाची ओळख झाली आणि त्यानंतर लग्न करण्यापर्यंत हे प्रकरण गेले. यानंतर ते दोघेही पळून गेले. मात्र, काही दिवसातच युवकाने त्या महिलेवर धर्मपरिवर्तन करण्यासाठी दबाव टाकत राहिला व जबरदस्तीने तिच्यासोबत लग्न केले. यातून सुटका करत महिला आपल्या घरी आली. त्यानंतर यासंदर्भातली तक्रार तिने उदयपूर पोलीस ठाण्यात दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेला एक लहान मुलगी आहे. याप्रकरणानंतर तिच्या पतीनेही महिलेला माफ केले आहे. आरोपी युवक व त्याच्या साथीदारावर कारवाई करण्याची मागणी पीडित कुटुंबाने केली आहे.