ETV Bharat / bharat

त्रिपुरात पुरामुळे हाहाकार; ७०० हून अधिक लोक विस्थापित, मदतकार्य सुरू

त्रिपुरात सुरू असलेल्या पावसामुळे आणि पुराच्या पाण्यामुळे ७०० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.

त्रिपुरातील पुरपरिस्थिती
author img

By

Published : May 26, 2019, 1:28 PM IST

नवीदिल्ली - त्रिपुरात सुरू असलेल्या पावसामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झाली आहे. येथे वादळ आणि पुराच्या पाण्यामुळे ७०० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. याव्यतिरिक्त, राज्यात सततच्या पावसामुळे पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे.

या आपत्तीमुळे जवळपास १ हजार घरे प्रभावित झाली आहेत. जुरी आणि काकाटी नदीला पूर आला आहे. बचाव कार्य करण्यासाठी ९ स्पीड बोटी आणि ४० बचाव बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. याद्वारे घरामध्ये अडकलेल्या लोकांना घरातून बाहेर काढले जात आहेत.

त्रिपुरा राज्य रायफल्स बचाव कार्यासाठी प्रयत्न करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उनाकोटी जिल्ह्यात ३५८ लोक बेघर आहेत आणि ३८१ उत्तर त्रिपुरामध्ये बेघर आहेत. याव्यतिरिक्त अजय धाली जिल्ह्यात १ हजार ३९ घरांची पडझड झाली आहे.

पुढील 24 तासांत पाऊस पडला नाही, तर पाणी पातळी कमी होण्याची अपेक्षा आहे. मदत शिबिरांत लोकांना अन्न व औषधे पुरविली जात आहेत. "उत्तर त्रिपुरा, उनाकोटी आणि धलाई जिल्हे यामध्ये प्रभावित झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य सरत दास यांनी दिली.

यासंदर्भात एक राज्य आपत्ती अभियान केंद्र (एसईओसी) अहवालात म्हटले आहे, की ७९३ लोक मदत शिबिरात आश्रय घेणाऱ्यांपैकी ३५८ लोक उनाकोटी जिल्ह्यातील तर उत्तर त्रिपुरा जिल्ह्यात ३८१ लोक आहेत. अतिवृष्टीमुळे १ हजार ३९ घरांचे नुकसान झाले आहे. त्यांनी सांगितले की, राज्यातील महसूल विभागाने प्रभावित भागातील लोकांना वाचवण्यासाठी ४० बोटींची सोय केली आहे.

"राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि त्रिपुरा राज्य रायफल्सदेखील (टीएसआर) मदत ऑपरेशनमध्ये सामील झाले आहेत, अशी माहिती दास यांनी दिली. उनकोटी जिल्ह्यातील मनू नदीच्या पाणी पातळीने शनिवारी दुपारी धोक्याची पातळी गाठली. हवामान विभागाने रविवारीही पाऊस आणि वादळ राहील, असा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे अनेक लोकांना आपल्या घरांना सोडून मदतकार्य शिबिरात आश्रयाला जावे लागत आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.