पणजी - दोन दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. 40 सदस्यांच्या सभागृहात सत्ताधारी भाजपकडे 28 आमदार आहेत. त्यामुळे सुमारे महिनाभर चालणाऱ्या या अधिवेशनात विरोधी पक्षाच्या भूमिकेकडे संपूर्ण गोव्याचे लक्ष लागून राहिले आहे.
दोन दिवसांपूर्वी मंत्रिमंडळामध्ये फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामध्ये काँग्रेसमधून फुटून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बाबू कवळेकर यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात आले आहे. तर, दुसरीकडे काँग्रेसकडे अजूनही 5 आमदार असल्याने विरोधी पक्षनेतेपद त्यांच्याकडेच राहण्याची शक्यता आहे. परंतु, आज अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, तरीही विरोधी पक्षनेता निवडण्यात आलेला नाही. त्यामुळे पहिला दिवस विरोधी पक्षनेत्याविनाच कामकाज होण्याची शक्यता आहे.