कोलकाता - पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात एका व्यक्तीला जमावाने बेदम मारहाण केली. दुसऱया एका व्यक्तीवर हल्ला करून तो पळून जात होता. यावेळी, आजूबाजूच्या लोकांनी त्याला पकडून मारहाण केली, त्यातच त्याचा मृत्यू झाला. बाकिउल्ला मोल्ला, असे या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, भांगोरे गावातील सतुलिया बझार या परिसरात बाकिउल्लाने मणिरूल इस्लाम बिस्वास याच्यावर कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला बिस्वास हा जागीच कोसळला. परिसरामध्ये बऱ्याच प्रमाणात लोकप्रिय असलेल्या बिस्वासवर हल्ला झाल्याचे पाहताच, आजूबाजूच्या लोकांनी पळून जाणाऱ्या मोल्ला याला अडवून त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बिस्वास आणि मोल्ला या दोघांना सरकारी रूग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान मोल्लाने आपले प्राण सोडले, तर बिस्वासची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी यासंदर्भात तपास सुरु केला आहे.
हेही वाचा : काश्मिरमध्ये दहशतवाद्यांचा सफरचंद व्यापाऱ्यांवर हल्ला; तीन दिवसांमधील तिसरी घटना