नंदीग्राम - आंध्रप्रदेशातील एका व्यक्तीने ५० सेंकदामध्ये १०० जोर (पुशअप) काढण्याचा विक्रम केला आहे. नुरुद्दीन असे हा विक्रम करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. कृष्णा जिल्ह्यातील नंदीग्राम शहरात एका कार्यक्रमात नुरुद्दीनने हा विक्रम केला.
'डिक्लाईन पुशअप' ही जोर मारण्याची एक अवघड पद्धत आहे. यामध्ये हाताच्या तुलनेत पाय अधिक उंचीवर असतात. अवघड समजले जाणारे हे पुशअप नुरुद्दीनने 50 संकदात पूर्ण केले. नुरुद्दीनचे नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये समाविष्ट होणार आहे.