लखनऊ - उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमध्ये आंतरधर्मीय प्रेमप्रकरणातून एकाची हत्या झाली आहे. झीशान असे मृत तरुणाचे नाव आहे.
बुलंदशहच्या अहमदनगर परिसरात राहणाऱ्या झीशान आणि अंजलीचे एकमेकांवर प्रेम होते. बुधवारी सायंकाळी अंजलीच्या घराजवळ त्या दोघांची भेट झाली. अंजलीच्या घरच्यांनी त्यांना पाहिल्यावर, त्यांनी झीशानला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याचा खून करण्यात आला.
यानंतर, मुलीच्या कुटुंबीयांनी त्याचा मृतदेह पोत्यात भरून आपल्या घरात लपवून ठेवला. या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वीच त्यांचे हे कृत्य उजेडात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झीशान आणि अंजली हे वेगवेगळ्या धर्माचे असल्यामुळे अंजलीच्या घरच्यांना त्यांचे प्रेमप्रकरण नामंजूर होते. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले.
हेही वाचा : ओडिशा सरकारचं 'विकेंड शटडाऊन'; 31 जुलैपर्यंत शैक्षणिक संस्था बंद