जयपूर - राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. आपल्या सोळा वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या बापाला पोलिसांनी अटक केली आहे. गुरुवारी रात्री मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपीला ताब्यात घेण्यात आले.
पीडितेने आपल्या तक्रारीमध्ये सांगितले, की गेल्या पाच वर्षांपासून हा बाप तिच्यावर अत्याचार करत होता. गुरुवारी रात्रीदेखील असाच प्रयत्न करत असताना, तिने कसाबसा तिथून पळ काढला, आणि जवळचे महिला पोलीस ठाणे गाठले. तिने दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपीला अटक करण्यात आली, त्यानंतर शुक्रवारी त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच, याबाबत पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
हेही वाचा : धक्कादायक! भाजीत मीठ न टाकल्याने पत्नीची हत्या, पती फरार
ओडिसामध्येही एक घटना-
ओडिशामध्ये एका कॅन्सरग्रस्त महिलेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. केरेदागडा गावातील शिवमंदिरात ही महिला पूजा करत असताना, ती एकटे असल्याचे पाहून तीन जणांच्या टोळक्याने तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्या महिलेने आरडाओरडा करताच, त्या तिघांनी तेथून पळ काढला. यामधील दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती राजनगर पोलीस ठाण्याचे इन्सपेक्टर तपन कुमार नायक यांनी दिली.
हेही वाचा : सहा वर्षाच्या चिमुरडीचा अत्याचार करून खून, पीडितेच्या मैत्रिणीचा बापच निघाला आरोपी!