ETV Bharat / bharat

ममता बॅनर्जींनी बोलावली तृणमूलच्या आमदारांची बैठक; २०२१च्या विधानसभेसाठी मोर्चेबांधणी - प्रशांत किशोर

२०२१ मधील विधानसभा निवडणुकीचे धोरण ठरवण्यासाठी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलवली आहे.

author img

By

Published : Jul 27, 2019, 10:21 PM IST

कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पुढील आठवड्यात सर्व तृणमूल काँग्रेसच्या आमदारांची बैठक बोलावल्याची माहिती पक्षाच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. राज्यात २०२१ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये आघाडी कायम राखण्यासाठी तसेच, निवडणूकपूर्व धोरण या बैठकीत ठरवण्यात येणार आहे.

२९ जुलैला पक्षाच्या सर्वेसर्वा ममता यांनी आगामी विधानसभा निवडणुकांचे डावपेच व पक्षाची भूमिका यांसदर्भात बैठक आयोजित केल्याचे या नेत्याने सांगितले. तसेच, बैठकीदरम्यान पक्षाचे राजकीय सल्लागार व रणनिती तज्ञ प्रशांत किशोर यांच्याशी चर्चा होणार असल्याचे ते म्हणाले.

सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारमधील उणिवांचा अभ्यास करून आगामी काळात त्यामध्ये सुधारणा करण्यासंबंधी चर्चा होणार असल्याचे कळते.

मागील लोकसभा निवडणुकांत पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने ४२ पैकी १८ जागा जिंकून उल्लेखनीय कामगिरी केली होती. लोकसभा निवडणुकांमध्ये पीछेहाट झाल्याने तृणमूल काँग्रेसने राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचे ठरवले आहे.

Intro:Body:

national

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.