तिरुवनंतपुरम - मलप्पुरममधील अथवनाद येथील रम्या हाइलिंग ही केरळसह संपूर्ण भारताचा अभिमान बनली आहे. वयाच्या अवघ्या एकोणीसाव्या वर्षी तिने हिमालय सर करण्याची कामगिरी केली आहे. या 'माउंट क्लाइंबिंग' मोहिमेसाठी विविध राज्यांमधून एकूण 85 लोक निवडले गेले होते. त्यात रम्याने केरळ आणि लक्षद्वीप या दोन ठिकाणांचे प्रतिनिधित्व केले आहे. रम्या बीकॉमची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहे.
हेही वाचा - JNU आंदोलन: रस्त्यावर बसून अभ्यास करत विद्यार्थ्यांचा मोर्चा
रम्या सुब्रह्मण्यम आणि उषा यांची मुलगी आहे. या कामगिरीसाठी तिरुर येथील टीएमजी कॉलेजचे एनसीसी अधिकारी लेफ्टनंट शुकूर इल्लम यांच्याकडून रम्याला प्रेरणा मिळाली. तिने आपले प्राथमिक शिक्षण आथवनाद पारीथी या शासकीय शाळेत पूर्ण केले. रम्या राज्यस्तरीय खो-खो संघाची सदस्य होती. रम्या उत्तम नृत्यदेखील करते. भविष्यात भारतीय सैन्यात दाखल होऊन देशाची सेवा करण्याची इच्छा असल्याचे रम्या सांगते.